आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रोलिंगला बळी:बकेट स्टाइल हँडबॅग घेऊन पोहोचली अनन्या पांडे, लोकांनी चेष्टा करत विचारले - ही पर्स आहे की बादली?

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नुकताच मुंबईत एक अवॉर्ड सोहळा रंगला. या सोहळ्याला बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली. माधुरी दीक्षित, शिल्पा शेट्टी, क्रिती खरबंदा, पुलकित सम्राट, सोनम बाजवा, सुश्मिता सेन, जान्हवी कपूर, आयुष्मान खुराणासह अनेक सेलिब्रिटी यावेळी ग्लॅमरस लूकमध्ये दिसले. पण यावेळी अभिनेत्री अनन्या पांडेने अधिक लक्ष वेधून घेतले. पण यावेळी तिच्या लूकची नव्हे तर तिच्या पर्सची जास्त चर्चा रंगली. तिने बादलीच्या आकाराची एक छोटी पर्स यावेळी कॅरी केली होती. त्यामुळे नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली. अनन्याचा या इव्हेंटमधील एक व्हिडिओ समोर आला आहे.

या व्हिडिओमध्ये अनन्या पिंक कलरच्या आउटफिटमध्ये दिसत आहे. तिने आपला हा लूक बकेट स्टाइल बॅग कॅरी करत पूर्ण केला. तिच्या या पर्सने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.

पापाराझींनी दिली प्रतिक्रिया
या व्हिडिओमध्ये अनन्याच्या हातात गोल्डन कलरची बकेट स्टाइल बॅग दिसतेय. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या पापाराझींनीही ही पर्स पाहून अभिनेत्रीला विचारले, 'मॅडम ही पर्स आहे की बादली'. हे ऐकून सगळे हसायला लागतात. तर अनन्या देखील हसत तेथून निघून गेली.

लोक उडवत आहेत खिल्ली
अनन्याची ही पर्स पाहून लोक तिची खिल्ली उडवत आहेत. व्हिडिओवर कमेंट करताना एकाने विचारले 'दाल तडक्याची बादली, परत जाताना सोबत घेऊन जा.' आणखी एकाने लिहिले, 'या पर्सचा आकार अनन्याच्या संघर्षाएवढा आहे.' 'ते सगळं ठीक आहे, पण एवढ्या पर्समध्ये काय ठेवणार'? असे एकाने विचारले आहे.

अनन्या पांडेचे आगामी चित्रपट
अनन्या शेवटची लायगर या चित्रपटात झळकली होती. यात विजय देवरकोंडासोबत तिने स्क्रीन शेअर केली. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉपच्या यादीत जमा झाला. आता अनन्या लवकरच आयुष्मान खुराणासोबत 'ड्रीम गर्ल 2' मध्ये झळकणार आहे.