आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एनसीबीच्या निशाण्यावर अनन्या पांडे:आर्यन आणि सुहानाची बालपणीची मैत्रीण आहे अनन्या, अनेक वेळा पार्टीत दिसली सोबत; आर्यन आणि अनन्या यांच्यातच ड्रग्जसंदर्भात झाले होते बोलणे

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिनेता चंकी पांडेची मुलगी आहे अनन्या

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेसुद्धा आता ड्रग्ज प्रकरणात अडकताना दिसत आहे. एनसीबीने तिच्या मुंबईतील घरावर छापा टाकला आहे. अलीकडेच वृत्त आले होते की, एनसीबीला या प्रकरणात आर्यन खानसोबत एका नवोदित बॉलिवूड अभिनेत्रीचे चॅटदेखील मिळाले आहेत. ही नवोदित अभिनेत्री अनन्या पांडेच असल्याचे आता समोर आले आहे. याच आधारे अनन्याच्या घरावर कारवाई झाली आहे.

आर्यन आणि अनन्या यांच्यामध्ये ड्रग्जसंदर्भात बरीच चर्चा झाल्याचे सूत्रांनी उघड केले आहे. ज्यामध्ये अनन्या आर्यनला सांगते की तिच्या घरातही ड्रग्ज आहेत. याचा शोध घेण्यासाठी एनसीबीची टीम अनन्याच्या घरी पोहोचली असल्याची शक्यता आहे.. काही स्टार किड्स गेल्या काही काळापासून NCB च्या रडारवर आहेत. अनन्या पांडे ही आर्यन खान आणि त्याची बहीण सुहाना खानची बालपणीची मैत्रीण आहे. सोशल मीडियावर त्यांच्यासोबत तिचे अनेक फोटोही पाहायला मिळतात.

आर्यन-सुहाना आणि इतर मित्रांसोबत अनन्या.
आर्यन-सुहाना आणि इतर मित्रांसोबत अनन्या.

अनन्या अनेक वेळा आर्यन आणि सुहानासोबत पार्टी करताना दिसली आहे आणि त्यांची छायाचित्रे देखील सोशल मीडियावर अनेक वेळा समोर आली आहेत.

अनन्या पांडे, शनाया कपूर आणि सुहाना खान यांचा बालपणीचे फोटो.
अनन्या पांडे, शनाया कपूर आणि सुहाना खान यांचा बालपणीचे फोटो.

अनन्या पांडे, शनाया कपूर, नव्या नवेली नंदा आणि सुहाना खान या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. अनेक वेळा अनन्याला शाहरुख खानच्या घरी पार्टीत सहभागी होतानाही पाहिले गेले आहे.

शाहरुखच्या घरच्या पार्टीत अनन्या.
शाहरुखच्या घरच्या पार्टीत अनन्या.

अभिनेता चंकी पांडेची मुलगी आहे अनन्या
अनन्याबद्दल बोलायचे झाले तर तिचा जन्म 30 ऑक्टोबर 1998 रोजी झाला. ती बॉलिवूड अभिनेता चंकी पांडेची मुलगी आहे. 23 वर्षीय अनन्याने तिचे शालेय शिक्षण मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून केले. अनन्याने 2019 मध्ये 'स्टुडंट ऑफ द इयर 2' मधून पदार्पण केले होते ज्यात ती टायगर श्रॉफ आणि तारा सुतारिया सोबत दिसली होती.

'स्टुडंट ऑफ द इयर 2' च्या पोस्टरवर अनन्या पांडे.
'स्टुडंट ऑफ द इयर 2' च्या पोस्टरवर अनन्या पांडे.

अनन्या देखील त्या स्टारकिड्सपैकी एक आहे ज्यांना करण जोहरचे प्रोडक्शन हाऊस धर्मा प्रोडक्शन निर्मित चित्रपटांद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. 'स्टुडंट ऑफ द इयर 2' मध्ये पदार्पण केल्यानंतर अनन्याला फिल्मफेअरचा बेस्ट फिमेल डेब्यू अवॉर्ड मिळाला होता. याशिवाय तिला झी सिने अवॉर्डचा बेस्ट फिमेल डेब्यूचा पुरस्कारही मिळाला आहे.

अनन्याच्या हातात अनेक चित्रपट
'स्टुडंट ऑफ द इयर 2' या चित्रपटातून पदार्पण केल्यानंतर अनन्या कार्तिक आर्यन, भूमी पेडणेकर यांच्यासोबत पती पत्नी और वो 2 मध्ये दिसली होती. यानंतर 2020 मध्ये ईशान खट्टरसह तिचा खाली पीली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. अनन्याच्या आगामी चित्रपटांविषयी बोलायचे झाले तर ती दिग्दर्शक शकुन बत्रा यांच्या अद्याप शीर्षक न ठरलेल्या रोमँटिक ड्रामा चित्रपटात दिसणार आहे.

या चित्रपटात तिच्यासोबत दीपिका पदुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदी दिसणार आहेत. या चित्रपटाव्यतिरिक्त अनन्या 'लाइगर' चित्रपटात साऊथ स्टार विजय देवराकोंडासोबत दिसणार आहे. अलीकडेच अनन्याने आणखी एक चित्रपट साइन केला आहे ज्याचे नाव आहे 'खो गए हम कहां'. अनन्याशिवाय या चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदी आणि आदर्श गौरव यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. अनन्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि इन्स्टाग्रामवर तिचे 20.3 मिलियन फॉलोअर्स आहेत.

बातम्या आणखी आहेत...