आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेची चुलत बहीण अलाना पांडे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. तत्पूर्वी तिच्या प्री-वेडिंग कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. अलाना ही अनन्याची चुलत बहीण आहे. म्हणजेच अलाना चंकी पांडे यांच्या मोठ्या भावाची मुलगी आहे.
अनन्याने बुधवारी अलाना पांडेच्या प्री-वेडिंग फंक्शनला हजेरी लावली, ज्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये अनन्या गुलाबी रंगाच्या लेहेंग्यात अतिशय सुंदर दिसली. अनन्यासोबत तिचे वडील चंकी पांडे आणि आई भावना पांडेही व्हिडिओमध्ये दिसत आहेत. चंकी पापाराझींसमोर आपल्या लेकीचे लाड करताना दिसले. व्हिडिओ समोर येताच चाहते सोशल मीडियावर अनन्याच्या लूकचे कौतुक करत आहेत.
अनन्याने तिच्या लूकचे फोटो इन्स्टा स्टोरीवर शेअर केले आहेत.
कोण आहे अलाना पांडे?
अलाना पांडे ही चंकी पांडे यांचे थोरले भाऊ चिक्की पांडे यांची मुलगी आहे. ती एक मॉडेल असण्यासोबतच सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर आहे. तर तिचा बॉयफ्रेंड आयव्हर हा फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर आहे. 2021 मध्ये या जोडप्याने मोठ्या थाटामाटात साखरपुडा उरकला होता. दोघेही अमेरिकेत एकत्र राहतात.
सोहेल खानच्या घरी झाला मेंदी सोहळा
मंगळवारी अलानाचा मेंदी सोहळा पार पडला. अभिनेता सोहेल खानच्या घरी हा सोहळा झाला. सोहेल खान आणि अलानाचे वडील चिकी दोघे खूप घनिष्ठ मित्र आहेत. त्यामुळे अलानाचा मेंदी सोहळा सोहेलच्या घरी झाला. 16 मार्च रोजी ताज पॅलेसमध्ये अलाना आणि आयव्हर यांचे लग्न होणार आहे.तत्पूर्वी घरीच दोघांना हळदी लागली. हळदी समारंभाला गौरी खान, महीप कपूर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
अनन्या पांडेचा आगामी चित्रपट
सध्या अनन्या पांडेही तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आहे. नुकतीच ती लॅक्मे फॅशन वीकमध्ये आदित्य रॉय कपूरसोबत रॅम्पवर चालताना दिसली होती. यानंतर दोघांच्या रिलेशनशिपवर लोकांनी शिक्कामोर्तब केले आहे. या फॅशन शोमधील अनन्याचा ग्लॅमरस अवतार चाहत्यांना खूप आवडला. यासोबतच लोकांनी अनन्या आणि आदित्य यांच्या केमिस्ट्रीचेही खूप कौतुक केले. वर्क फ्रंटवर बोलायचे तर अनन्या लवकरच 'ड्रीमगर्ल 2' मध्ये दिसणार आहे. राज शांदिल्य दिग्दर्शित हा चित्रपट 7 जुलै 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.