आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झोया अख्तरचा आगामी चित्रपट:'गली बॉय' फेम सिद्धांत चतुर्वेदीसोबत स्क्रिन स्पेस शेअर करणार अनन्या पांडे, 'खो गए हम कहां'चे पहिले पोस्टर रिलीज

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे.

तरुण, ताजी आणि प्रासंगिक 'खो गए हम कहां' मुंबई शहरातील तीन मित्रांची 'डिजिटल' कहाणी आहे. याची पटकथा झोया अख्तर, अर्जुन वरैन सिंह, रीमा कागती यांनी लिहिली असून झोया अख्तर, रीमा कागती, रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात अभिनेते सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे आणि आदर्श गौरव यांच्या मुख्य भूमिका असून अर्जुन वरैन सिंह याचा पहिलाच दिग्दर्शकीय प्रयत्न असणार आहे.

झोया अख्तरच्या 'गली बॉय'च्या तुफान यशानंतर सिद्धांतचे (एमसी शेर) नाव घराघरात पोहोचले असून त्याला आता अनन्या सोबत स्क्रीन शेअर करताना पाहायला चाहते उत्सुक आहेत. आदर्शला देखील या दोघांसोबत एकत्र पाहणे, आनंददायक असणार आहे. त्याचे 'द व्हाइट टाइगर'मधल्या अभिनयासाठी खूप कौतुक झाले होते.

एक्सेल एंटरटेनमेंट आणि टाइगर बेबी यांनी आज आपला आगामी थिएट्रिकल प्रोजेक्ट 'खो गए हम कहाँ'ची घोषणा करत पोस्टर आणि व्हिडिओ रिलीज केला आहे. हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...