आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेलिब्रिटींचे ब्रेकअप:3 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर वेगळे झाले अनन्या पांडे- ईशान खट्टर, 2022 मध्ये या जोडप्याच्या प्रेमकहाणीचाही झाला अंत

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोण आहेत हे कपल जाणून घेऊया-

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे आणि अभिनेता ईशान खट्टर यांचे ब्रेकअप झाले आहे. 'खाली-पिली' या चित्रपटात एकत्र झळकलेली ही जोडी गेल्या 3 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होती, पण आता त्यांचे मार्ग वेगळे झाले आहे. रिलेशनशिपवर दोघे कधीही अधिकृत काहीही बोलले नव्हते. अनन्या-ईशान व्यतिरिक्त अनेक लोकप्रिय जोड्या वेगळ्या झाल्या आहेत. कोण आहेत हे कपल जाणून घेऊया-

धनुष-ऐश्वर्या

साऊथचा लोकप्रिय अभिनेता धनुषने लग्नाच्या 18 वर्षानंतर पत्नी ऐश्वर्याला घटस्फोट दिला आहे. ऐश्वर्या ही रजनीकांत यांची मुलगी आहे. घटस्फोटानंतर हे जोडपे त्यांच्या दोन मुलांचे सहपालक आहेत.

राखी सावंत - रितेश

ड्रामा क्वीन राखी सावंतने फेब्रुवारी 2022 मध्ये रितेशपासून घटस्फोट घेतला. 28 जुलै 2019 रोजी राखीने NRI रितेशसोबत लग्न केले होते. लग्नाच्या दोन वर्षांपासून हे नाते प्रसिद्धीझोतात होते. बिग बॉस 15 मध्ये रितेशने राखीसोबत भाग घेतला होता, मात्र शोमधून बाहेर पडताच दोघांनी घटस्फोट घेतला.

किम कार्दशियन- कान्ये वेस्ट​​​​​​​​​​​​​​

इंटरनॅशनल कपल किम कार्दशियन आणि कान्ये वेस्ट यांचा 2022 मध्ये घटस्फोट झाला. दोघेही गेल्या अनेक वर्षांपासून घटस्फोटासाठी कायदेशीर लढा देत होते.

जेसन मोमोआ - लिसा बोनेट​​​​​​​​​​​​​​

एक्वामॅन अभिनेता जेसन मोमोआने 2022 मध्ये पत्नी लिसा बोनेटपासून घटस्फोट घेतला. 2017 मध्ये दोघांचे लग्न झाले होते. ​​​​​​​

दिव्या अग्रवाल - वरुण सूद​​​​​​​​​​​​​​

'बिग बॉस' ओटीटी विजेती दिव्या अग्रवालने 2022 मध्ये बॉयफ्रेंड वरुण सूदसोबत ब्रेकअप केले. एका रिअ‍ॅलिटी शोमध्ये दोघांची भेट झाली, तिथून त्यांच्या नात्याला सुरुवात झाली होती.

बातम्या आणखी आहेत...