आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रेकअप:अनन्या पांडे आणि ईशान खट्टरचे ब्रेकअप, 3 वर्षानंतर 'या' कारणामुळे दोघांनी घेतला वेगळे होण्याचा निर्णय

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दोघांनी परस्पर संमतीने घेतला वेगळे होण्याचा निर्णय

अनन्या पांडे आणि ईशान खट्टर रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होत्या. पण, आता दोघांच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. रिपोर्ट्सनुसार, 3 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर आता या दोघांचे ब्रेकअप झाले आहे. 'खाली पीली' चित्रपटाच्या सेटवर दोघांची भेट झाली होती. गेल्या काही काळापासून हे दोघे त्यांच्या रिलेशनशिप स्टेटसमुळे चर्चेत आहेत.

दोघांनी परस्पर संमतीने घेतला वेगळे होण्याचा निर्णय
रिपोर्टनुसार, तीन वर्षे डेट केल्यानंतर दोघांनी आता एकमेकांसोबतचे नाते संपुष्यात आणले आहे. दोघांनी परस्पर सहमतीने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. दोघांचे ब्रेकअप झाल्याचे सूत्रांनी सांगितले. पण हे दोघेही त्यांचे मैत्रीचे नाते जपणार आहेत. एवढेच नाही तर भविष्यात एकत्र चित्रपट करण्याची संधी मिळाली तरी दोघेही एकत्र काम करण्यास सदैव तयार असतील. दोघांनाही समजूतदारपणाने या ब्रेकअपला सामोरे जायचे ठरवले आहे.

याच कारणामुळे झाले दोघांचे ब्रेकअप
सूत्रांनी सांगितले की, "मित्र म्हणून दोघांत सारं काही आलबेल आहे. त्यामुळे दोघांनी चांगल्या नोटेवर नाते संपवण्याचा निर्णय घेतला. दोघांमध्ये सामंजस्याचा अभाव होता. दोघांचीही गोष्टी आणि परिस्थिती पाहण्याची स्वतःची पद्धत आणि दृष्टीकोन आहे. अशा परिस्थितीत दोघांनाही एकत्र पुढे जाता येत नव्हते. अशा परिस्थितीत दोघांनीही आपापले मार्ग वेगळे करण्याचा निर्णय घेतला."

अनन्या-ईशान अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले
अनन्या-ईशान हे दोघे अनेकदा एकत्र सुट्टी एन्जॉय करताना, लंच-डिनर आणि सार्वजनिकरित्या एकमेकांसोबत स्पॉट झाले आहेत. ईशानने अनन्याला त्याचा भाऊ शाहिद कपूरच्या वाढदिवसाच्या पार्टीतही आमंत्रित केले होते. ज्याचे फोटोही सोशल मीडियावर समोर आले होते. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत अनन्या पांडेनेही तिच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल प्रतिक्रिया दिली होती. सिंगल नसल्याचे तिने सांगितले होते. तर ईशान एवढंच म्हणाला होता की, तो आनंदी आहे. अनन्यानेही ईशानला तिचा आवडता को-स्टार असल्याचे सांगितले होते.

अनन्या-ईशानने 'खाली पीली'मध्ये एकत्र केले होते काम
अनन्या आणि ईशानने 2020 मध्ये 'खाली पीली' या चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटात अनन्याने ईशानेचे बालपणीचे प्रेम पूजाचे पात्र साकारले होते. विभक्त झाल्यानंतर अनेक वर्षांनी दोघे पुन्हा भेटतात. हा चित्रपट काही बॉक्स ऑफिसवर विशेष कमाल दाखवू शकला नाही, मात्र या दोघांच्या जोडीची बरीच चर्चा झाली.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अनन्याचा 'गहराइयां' हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. या चित्रपटात अनन्यासह दीपिका पदुकोण, सिद्धांत चतुर्वेदी आणि धैर्य कारवा मुख्य भूमिकेत आहेत. दुसरीकडे, ईशान लवकरच कतरिना कैफ आणि सिद्धांत चतुर्वेदीसोबत 'फोन बूथ'मध्ये दिसणार आहे.

बातम्या आणखी आहेत...