आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लोकप्रिय कलाकार काळाच्या पडद्याआड:'अंदाज अपना अपना' आणि 'बॉर्डर'चे सिनेमॅटोग्राफर ईश्वर बिदरी यांचे निधन, हृदय विकाराचा झटक्याने मालवली प्राणज्योत

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ईश्वर बिदरी यांच्या निधनामुळे बॉलिवूड सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.

बॉलिवूडचे लोकप्रिय सिनेमॅटोग्राफर ईश्वर बिदरी यांचे रविवारी सकाळी वयाच्या 87 व्या वर्षी निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांना एका लग्नसोहळ्यादरम्यान हृदय विकाराचा झटका आला होता. त्यानंतर लगेचच त्यांना बेळगावच्या केएलईएस रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र रविवारी सकाळी उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची माहिती त्यांचा मुलगा संजीव बिदरी यांनी दिली आहे. ईश्वर बिदरी यांना 90 च्या दशकातील सुपरहिट चित्रपट 'अंदाज अपना अपना' आणि 'बॉर्डर' या चित्रपटांसाठी ओळखले जाते.

संजीव बिदरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 डिसेंबर रोजी कर्नाटकातील बेळगाव येथे एका विवाह सोहळ्यादरम्यान वडिलांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर तत्काळ त्यांना केएलईएस रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात पोहोचल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा हृदयविकाराचा झटका आला. वयामुळे त्यांना अनेक आरोग्य समस्या होत्या. उपचारादरम्यान रविवारी सकाळी 9.50 वाजता त्यांचे निधन झाले.

ईश्वर बिदरी यांनी जेपी दत्तांबरोबर केले काम
ईश्वर बिदरी यांनी चित्रपट निर्माता जे.पी.दत्ता यांच्याबरोबर बराच काळ काम केले होते. या दोघांनी 'यतिम', 'शस्त्र', 'हथियार' आणि 'बंटवारा', 'बॉर्डर' या चित्रपटांसाठी एकत्र काम केले होते. किंबहुना या चित्रपटांमधून दोघांनाही वेगळी ओळख मिळाली होती. याशिवाय ईश्वर बिदरी यांनी 'अब के बरस', 'कभी कहीं' आणि 'ढाई अक्षर प्रेम के' या चित्रपटांसाठी देखील सिनेमॅटोग्राफी केली. सिनेमॅटोग्राफीसोबतच त्यांनी काही दाक्षिणात्य चित्रपटांची निर्मिती देखील केली आहे.

बातम्या आणखी आहेत...