आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'अवतार द वे ऑफ वॉटर' अर्थात 'अवतार 2' हा चित्रपट शुक्रवारी भारतात प्रदर्शित झाला असून चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. पण जेम्स कॅमेरॉनचा 'अवतार द वे ऑफ वॉटर' पाहताना एका चाहत्याच्या बाबतीत धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. चित्रपटगृहात चित्रपट पाहात असताना एका प्रेक्षकाचे निधन झाले आहे.
कुठे घडली ही घटना?
आंध्रप्रदेशमध्ये काकीनाड जिल्ह्यातील पेड्डापुरम शहरातील थिएटरमध्ये लक्ष्मीरेड्डी श्रीनू नावाची व्यक्ती अवतार 2 चित्रपट पाहण्यासाठी पोहोचली आणि त्यांच्यासोबत ही भयंकर घटना घडली. हृदयविकाराचा झटका आल्याने लक्ष्मीरेड्डी यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार लक्ष्मीरेड्डी पेड्डापुरम याठिकाणी त्यांचा भाऊ राजूसह 'अवतार 2' पाहण्यासाठी गेले होते. चित्रपट पाहत असतानाच ते कोसळले. दरम्यान त्यांच्या भावाने लक्ष्मीरेड्डी यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. लक्ष्मीरेड्डी यांच्या पश्चात त्यांची मुलगी आणि एक मुलगा आहे.
2010 मध्येही घडली होती अशीच घटना
2010 मध्ये ‘अवतार’चा पहिला भाग प्रदर्शित झाला होता. यादरम्यानही अशीच एक घटना घडली होती. त्यावेळी एजन्सी फ्रान्स प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार तैवानमध्ये ‘अवतार’चा पहिला भाग पाहत असताना 42 वर्षीय व्यक्तीचे हृदयविकाराच्या आजाराने निधन झाले होते.
14 वर्षांनंतर आला 'अवतार द वे ऑफ वॉटर'
'अवतार'चा दुसरा भाग 'अवतार दे वे ऑफ वॉटर' हा चित्रपट 14 वर्षांनी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चाहते ब-याच काळापासून या चित्रपटाच्या प्रतिक्षेत होते. भारतात हा चित्रपट इंग्रजी, हिंदी, तामिळ, तेलुगू आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. अवतारच्या या दुसऱ्या भागात सॅम वर्टिंग्टन, स्टीफन लँग आणि केट विनस्लेट यांच्या मुख्य भूमिका आहेत.
जेम्स कॅमेरॉन हे जगातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आहेत, याची साक्ष त्यांचा 'अवतार: द वे ऑफ वॉटर' हा चित्रपट देतो. त्यांच्या मागील चित्रपटांप्रमाणेच यावेळीही कॅमेरॉन यांनी नेत्रदीपक अशी कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे. महामारीनंतर चित्रपट निर्माते सहसा त्यांच्या चित्रपटांमध्ये कुटुंब आणि कौटुंबिक मूल्यांना प्राधान्य देत आहेत. कॅमेरॉन यांनीदेखील त्यांच्या चित्रपटात तंत्रज्ञानाचा सुंदर वापर करत कुटुंब आणि या जगाप्रती असलेल्या आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव करुन दिली आहे. व्हिडिओत अवघ्या एका मिनिटात जाणून घ्या रिव्ह्यू...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.