आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनावर यशस्वी मात:कोरोनातून बरे होऊन 16 दिवसांनी घरी परतला अंगद बेदी, व्हिडिओ शेअर करत म्हणाला - 'आम्हाला आमच्या माणसांची किंमत कळाली'

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या महिन्याच्या सुरुवातीला अंगदला कोरोनाची लागण झाली होती.

बॉलिवूड अभिनेता अंगद बेदी यालाही काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर अंगदला आयसोलेशनमध्ये ठेवावे लागले होते. अखेर 16 दिवसांनी कोरोनाविरुद्धची लढाई जिंकून अंगद आपल्या घरी परतला आहे. घरी परतताच आपली पत्नी नेहा धुपिया आणि मुलीला पाहून तो आनंदी आहे. आपल्या कुटुंबासोबतच्या भेटीचा हा क्षण त्याने व्हिडिओच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केला आहे. यात अंगदची मुलगी मेहेर धावत येऊन त्याला बिलगताना दिसतेय. त्याने शेअर केलेल्या व्हिडिओची सुरुवात नेहाच्या आवाजाने होते. पाठमोऱ्या उभ्या असणाऱ्या आपल्या मुलीला नेहा तिचे बाबा घरी आल्याचे सांगते.

हा व्हिडिओ शेअर करत अंगदने लिहिले, 'कोरोना तू सगळ्या मनुष्य जातीवर तुझा प्रभाव दाखवत आहेस. ही वेळ खूप कठीण आहे. परंतु, यामुळे एक गोष्ट समोर आली आहे ती म्हणजे आम्हाला आमच्या माणसांची किंमत कळाली. मी अखेर 16 दिवसांनी कोरोनावर मात करून पुन्हा माझ्या कुटुंबाला भेटलो आहे. माझी पत्नी नेहा आणि मुलगी मेहेर यांना पाहून मी खूप आनंदी आहे. त्या स्वतः खूप कठीण परिस्थितीला तोंड देत होत्या.'

अंगद पुढे म्हणाला, 'घरी परत येण्याशिवाय चांगली दुसरी कोणतीही भावना नाहीये. मी माझ्या घरी आहे. देवाची आमच्यावर अशीच कृपा दृष्टी राहू दे.'

या व्हिडिओवर कमेंट करताना अंगदची पत्नी आणि अभिनेत्री नेहाने लिहिले, 'आम्ही देखील प्रत्येक दिवस, प्रत्येक मिनिट आणि प्रत्येक सेकंद तुला मिस करत होतो...'

या महिन्याच्या सुरुवातीला अंगदला कोरोनाची लागण झाली होती, त्यानंतर त्याने स्वतःला आयसोलेट केले होते.

बातम्या आणखी आहेत...