आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अनिल कपूर हे वयाच्या 66 व्या वर्षीही अतिशय फिट आहेत. इंडस्ट्रीतील फिट अभिनेत्यांमध्ये त्यांची गणना होता. काही दिवसांपूर्वीच अनिल ऑक्सिजन मास्क घालून ट्रेडमिलवर धावताना दिसले होते. आता त्यांनी त्यांच्या वर्कआउटचा एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओत अनिल चक्क उणे 110 अंश सेल्सिअस तापमानात वर्कआउट करताना दिसत आहेत. यावेळी त्यांनी ऑक्सिजन मास्कदेखील घातला आहे.
अनिल कपूर यांनी शेअर केला नवीन वर्कआउट व्हिडिओ
अनिल कपूर यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर उणे 110 अंश सेल्सिअस तापमानात शर्टलेस होऊन वर्कआउट करतानाचे दोन व्हिडिओ शेअर केले आहेत. व्हिडिओमध्ये ते शॉर्ट्स, मास्क आणि विंटर गियर घालून क्रायोथेरपी करताना दिसत आहेत. व्हिडिओ शेअर करताना अनिल यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, '40 व्या वर्षी खोडकर बनण्यचा वेळ गेला. आता 60 व्या वर्षी सेक्सी होण्याची वेळ आली आहे.' क्रायोथेरपीला कोल्ड थेरपी देखील म्हणतात. ही थेरपी केल्यामुळे शरीरातील चरबी कमी होते.
कपिल शर्माने दिली प्रतिक्रिया
अनिलच्या या व्हिडिओवर कमेंट करत कॉमेडियन आणि अभिनेता कपिल शर्माने लिहिले, 'व्वा, मलाही हे करायचे आहे.' तर एका चाहत्याने कमेंट करत लिहिले, 'हे आहे त्यांचे तरुण दिसण्याचे रहस्य'. तर एका यूजरने चक्क अनिल कपूर यांच्या पत्नी सुनीता कपूर यांना टॅग करत म्हटले की, 'सुनीता कपूर कृपया त्यांना कंट्रोल करा.'
ऑक्सिजन मास्क घालून केला व्यायाम
यापूर्वी, अनिल यांनी सोशल मीडियावर आणखी एक वर्कआउटचा व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये ते ऑक्सिजन मास्क घालून ट्रेडमिलवर वर्कआउट करताना दिसले होते. त्यासह त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले होते, 'फायटर मोड ऑन.' हा व्हिडिओ समोर आल्यानंतर चाहत्यांनी त्यांच्या फिटनेसचे कौतुक केले होते.
अनिल कपूर यांचे चित्रपट
अनिल कपूर शेवटचे 'द नाईट मॅनेजर' या चित्रपटात दिसले होते. या चित्रपटात त्यांच्यासोबत आदित्य रॉय कपूर आणि शोबिता धुलिपाला यांच्या मुख्य भूमिका होत्या. त्याचबरोबर अनिल लवकरच सिद्धार्थ आनंद यांच्या 'फायटर' या चित्रपटात दिसणार आहेत. यात त्यांच्यासह हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय ते रणबीर कपूर, रश्मिका मंदाना आणि बॉबी देओल यांच्यासोबत संदीप रेड्डी वंगा यांच्या 'अॅनिमल' चित्रपटात दिसणार आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.