आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
'जुग जुग जियो' या चित्रपटाचे चित्रीकरण चंदीगड येथे सुरु होते. मात्र सेटवर दिग्दर्शक राज मेहता यांच्यासह ज्येष्ठ अभिनेत्री नीतू कपूर आणि अभिनेता वरुण धवन यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे चित्रपटाचे चित्रीकरण तीन आठवड्यांसाठी थांबवण्यात आले होते. मात्र आता सेटवरुन एक चांगली बातमी आहे. नीतू कपूर यांच्यानंतर आता वरुण धवननेदेखील कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा चित्रीकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे. अनिल कपूर आणि किआरा आडवाणी आणि प्राजक्ता कोळी पुढील आठवड्यापासून चित्रीकरणाला सुरुवात करणार आहेत.
मिड डेच्या रिपोर्टनुसार निर्माता शशांक खेतानच्या मार्गदर्शनाखाली असिस्टंट डायरेक्टर्सची टीम 17 डिसेंबरपासून चित्रपटाचे शूटिंग पुन्हा सुरू करतील. काही दिवसांनंतर नीतू कपूर आणि वरुण धवनही त्यांच्यात सामील होतील. मनीष पॉल देखील कोरोना पॉझिटिव्ह आला होता. तोही लवकरच आता सेटवर परत येईल.
नीतू कपूर यांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यांची मुलगी रिद्धिमाने पोस्ट शेअर करून आईचा कोरोना रिपोर्ट आता निगेटिव्ह आल्याची माहिती दिली होती. रिद्धिमा कपूरने तिच्या आईबरोबर एक फोटो शेअर केला होता. ज्याच्या कॅप्शनमध्ये रिद्धिमाने लिहिले होते, 'तुम्ही दिलेल्या शुभेच्छाबद्दल धन्यवाद.' नीतू यांनीही सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन लिहिले होते की, “या आठवड्याच्या सुरुवातीला मला कोरोनाची लागण झाल्याचे समजले आहे. सर्व सुरक्षा उपायांचे पालन केले जात आहे. सर्व प्रशासनाचे आभारी आहे. मी स्वत: ला वेगळे ठेवले आहे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घेत आहे आणि बरे वाटत आहे.” कोविड 19 चा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर नीतू यांना एअर अॅम्बुलन्सने चंदीगडहून मुंबईत आणण्यात आले होते.
दुसरीकडे वरुण धवनने पोस्ट शेअर करून कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली होती. त्याने एक फोटो शेअर करत लिहिले होते की, 'कोरोनाचा काळ संपल्यानंतर आम्ही चित्रपटाचे काम सुरू केले होते. शूटिंगच्या वेळी आम्ही सर्व खबरदारी घेतली होती. मात्र, तरीही कोरोना झाला. म्हणून कृपया खूप काळजी घ्या.'
‘जुग जुग जियो’ या चित्रपटात नीतू कपूर आणि अनिल कपूर यांच्यासह वरुण धवन, किआरा आडवाणी, प्राजक्ता कोळी ही कलाकार मंडळीदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. 'गुड न्यूज' फेम दिग्दर्शक राज मेहता या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.