आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अभिनेते अनिल कपूर यांनी 24 डिसेंबर रोजी वयाची 64 वर्षे पूर्ण केली आहेत. अनेक हिट चित्रपट देणा-या अनिल यांची लव्ह स्टोरी अतिशय इंट्रेस्टिंग आहे. त्यांनी 19 मे 1984 रोजी सुनीतासोबत लग्न केले होते. यंदा आपल्या लग्नाच्या 36 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी सुनितासोबतच्या सुरेख नात्याबद्दल उलगडा केला होता. याशिवाय त्यांनी लग्नाचे काही अनसीन फोटोदेखील शेअर केले होते.
अनेक दिवस टाळले होते लग्न
अनिल यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक छायाचित्र शेअर करु लिहिले होते, '19 मे हा माझ्या आयुष्यातील सर्वात चांगला दिवस आहे. मी सुनीता प्रपोज केले आणि तिला लग्नाची मागणी घातली. आमचे लग्न बरेच दिवस टळले. कारण मला सुनीताची चांगली काळजी घ्यायची होती. कमीत कमी मला तिच्यासाठी एक घर आणि घरी कूक ठेवायचा होता. '
नववधूच्या रुपात सुनीता बघून अनिल यांचे डोळे पाणावले होते
त्यांनी पुढे लिहिले, 'अनेक अडचणींनंतर 19 मे रोजी आम्ही लग्न केले. मला आठवतंय जेव्हा मी नवरदेव बनून तिच्या घरी गेलो, तेव्हा ती हसत होती. पण माझे डोळे पाणावले होते. आनंद आणि नव्हर्सनेसमुळे मला अश्रू आले होते. आमच्या लग्नाची तयारी एका दिवसात झाली होती. आम्ही मोठा लग्नसोहळा केला नव्हता. शिवाय आम्ही हनीमूनलाही गेलो नव्हतो. त्यामुळे आजही सुनीता मला चिडवते. पण तो क्षण माझ्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट क्षण होता.'
अनेकांनी अनिल यांना त्यांचा निर्णय चुकीचा असल्याचे सांगितले होते
अनिल यांनी पुढे सांगितले, 'अनेक लोकांनी भविष्यवाणी केली होती, लवकर लग्न केल्याने माझे करिअर बर्बाद होईल. मात्र मला तिच्याशिवाय एकही दिवस वाया घालवायचा नव्हता. ती कायम माझ्यासोबत असावी असे मला वाटायचे. आमच्यासाठी कधीच करिअर किंवा प्रेम असे समीकरण नव्हते, तर ते प्रेम आणि करिअर असे होते.'
सुनीता उचलत होत्या अनिल कपूर यांचा खर्च
स्ट्रगलिंगच्या काळात अनिल कपूर यांच्याजवळ पैसे नसायचे. तेव्हा सुनीता त्यांचा खर्च उचलत होत्या. जेव्हा दोघांची पहिली भेट झाली होती. तेव्हा अनिल कपूर एक स्ट्रगलिंग अॅक्टर होते आणि सुनीता या प्रसिद्ध मॉडेल. अनिल पहिल्याच नजरेत सुनीता यांच्या प्रेमात पडले होते. त्यांना सुनीता यांच्याजवळ जायचे होते मात्र त्यांना मार्ग सापडत नव्हता. अखेर त्यांच्या मित्रांनी सुनीता यांचा फोन नंबर त्यांना मिळवून दिला. कालांतराने दोघांत बातचीत सुरु झाली. अनिल सुनीता यांच्या आवाजाचे फॅन झाले होते. लग्नानंतर सुनीता यांनी अनिल यांच्या करिअरलाच आपले करिअर मानले. त्यांनी मॉडेलिंग सोडून घर सांभाळले आणि अनिल यांना साथ दिली. त्या अनिलसाठी ड्रेस डिझाइन करण्यापासून शूटिंगसाठी परदेशात जाण्यापर्यंतची सर्व कामे करायच्या.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.