आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाऊन मस्ती:मोकळ्या वेळेत पत्नी सुनीताबरोबर कॅरम खेळताना दिसले अनिल कपूर, सोनमने लिहिले - 'मला तुमची खूप आठवण येतेय'

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पत्नी सुनीतासोबत मोकळा वेळ घालवत आहेत अनिल कपूर.

अभिनेते अनिल कपूर सध्याचा लॉकडाऊनचा काळ आपल्या कुटुंबासमवेत घालवत आहेत. अलीकडेच त्यांनी पत्नी सुनीतासोबत कॅरम खेळतानाची छायाचित्रे इंस्टाग्रामवर शेअर केली आहेत. सोबतच कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले, 'आणि विजेता आहे… साहजिकच मी...'  अनिल यांनी सोलो छायाचित्राचे क्रेडिट पत्नी सुनीता यांना दिले, ज्यात ते राणीवर निशाणा साधताना दिसत आहेत, तर दुसरे छायाचित्र त्यांची धाकटी मुलगी रियाने क्लिक केले आहे.  

सोनमने दिली प्रतिक्रिया : पती आनंद आहूजासोबत सध्या दिल्लीत असलेल्या सोनमने छायाचित्र पाहिल्यानंतर, मी तुम्हा दोघींनाही खूप मिस करत असून तुम्हाला भेटण्यासाठी आणखी वाट पाहू शकत नाही, अशी प्रतिक्रिया दिली.  अनिल कपूर यांना स्लीपर्समध्ये पाहून शूजचा व्यवसाय करणारे त्यांचे जावई आनंद आहुजा यांनी एका कमेंटमध्ये लिहिले, "चांगले शूज." त्याचवेळी शिल्पा शेट्टीने लिहिले, 'व्वा !! आपण बॉलवर ज्या प्रकारे स्वतःला बॅलेन्स केले आहे, ते नक्कीच कौतुकास्पद आहे.'

अनिल कपूर यांनी लॉकडाऊनमध्ये बनवली बॉडी : 63 वर्षीय अनिल कपूर यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर स्वतःची काही छायाचित्रे शेअर करुन सांगितले होते की, लॉकडाऊनचा मोकळा वेळ त्यांनी आपल्या फिटनेसवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि बॉडी बनवण्यासाठी वापरला. छायाचित्रामध्ये अनिल आपले बाइसेप्स दाखवताना दिसत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...