आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
चंदिगडमध्ये सुरु असलेल्या ‘जुग-जुग जियो’ या चित्रपटाच्या टीममधील काही सदस्यांसह कलाकारांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आहे. शुक्रवारी सकाळपासूनच चित्रपटातील मुख्य कलाकार वरुण धवन, अनिल कपूर, नीतू कपूर आणि दिग्दर्शक राज मेहता यांचा कोविड 19 टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त होते. या चौघांचाही कोरोना टेस्टचा रिपोर्ट गुरुवारी सायंकाळी आला होता. मात्र आता अभिनेते अनिल कपूर यांनी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त फेटाळले आहे.
आपल्या सोशल मीडिया स्टोरीत अनिल यांनी लिहिले की, "अफवांना पूर्णविराम देण्यासाठी... माझी कोविड -19 ची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. काळजी आणि प्रार्थनाबद्दल तुम्हा सर्वांचे आभार." वृत्तानुसार, अनिल चंदीगडहून मुंबईला परतले आहेत. इतर कलाकारांविषयी सांगायचे म्हणजे, अद्याप कुणाकडूनही प्रतिक्रिया आलेली नाही.
चित्रपटाशी निगडित सूत्रांनी सांगितल्यानुसार, सध्या शूटिंग थांबवण्यात आले आहे. आज संध्याकाळपर्यंत चित्रपटाच्या टीमकडून याबाबत अधिकृत विधान केले जाण्याची शक्यता आहे. अलीकडेच अभिनेता आणि भाजपचे खासदार सनी देओल यांनाही कोरोनाची लागण झाली. ते सध्या हिमाचल प्रदेशमध्ये असून येथे क्वारंटाइन आहेत.
ऋषी कपूर यांच्या निधनानंतर नीतू कपूरचा पहिला चित्रपट
यावर्षी 30 एप्रिल रोजी ऋषी कपूर यांचे निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर नीतू कपूर यांचा 'जुग-जुग जियो' हा पहिला चित्रपट आहे. शूटसाठी रवाना होताना नीतू यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर करताना लिहिले होते, "या कठीण काळातली माझी पहिली फ्लाइट. मी या प्रवासाबद्दल थोडी घाबरले आहे." पुढे त्यांनी ऋषी कपूर यांची आठवण करुन लिहिले, "कपूर साहेब, माझा हात धरायला तुम्ही इथे नाहीत, पण मला माहित आहे की तुम्ही कायम माझ्याबरोबर आहात."
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.