आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऑन लोकेशन:'दिल धडकने दो'मधील एक सीनमध्ये अनिल कपूर राहुल बोसचा जीवच घेणार होते, जाणून घ्या नेमके काय घडले होते

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अनिल यांना आवळला होता राहुलचा गळा

2015 मध्ये आलेल्या 'दिल धडकने दो' या चित्रपटात अभिनेते अनिल कपूर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. या चित्रपटाच्या एका सीनदरम्यान अनिल यांनी असे काही केले की, ज्याची कल्पना त्यांना स्वतःलाही नव्हती. अनिल यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान घडलेला किस्सा शेअर केला आहे. 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दिल धडकने दो’ या चित्रपटाच्या सेटवर घडलेली ही घटना थक्क करणारी आहे. या चित्रपटाच्या एका सीनच्या शूटिंगवेळी अनिल कपूर यांनी अभिनेता राहुल बोस याचा जवळपास जीवच घेतला होता.

अनिल यांना आवळला होता राहुलचा गळा
‘दिल धडकने दो’ या चित्रपटात अनिल कपूर यांनी कमल मेहरा यांची भूमिका साकारली आहे. तर अभिनेत्री प्रियांका चोप्राने अनिल कपूर यांच्या मुलीची म्हणजेच आएशाची भूमिका साकारली होती. तर राहुल बोस प्रियांकाचा नवरा आणि अनिल यांच्या जावयाच्या भूमिकेत होता. चित्रपटातील एका दृश्यात राहुल आणि प्रियांका यांच्या नात्यामध्ये मतभेद निर्माण झाल्याचे दाखवण्यात आले होते यावेळी राहुल बोस सर्वांसमोर प्रियांकाला हाताला खेचून नेत असतो. मात्र याचवेळी अनिल कपूर चिडून सर्वांसमोर राहुल बोस याचा गळा दाबण्याचा प्रयत्न करतात असे दाखवण्यात आले होते. विशेष म्हणजे सीनचा भाग नसतानाही अनिल यांनी एक वायर खेचली आणि राहुल बोसच्या गळ्याभोवती आवळली. हे पाहून सेटवरचे सगळेच थक्क झाले होते. सीनचा भाग नसतानाही अनिल कपूर यांनी केलेल्या या कृत्याने सगळेच गोंधळले होते. अखेर त्यांना समजवण्यात आले. यानंतर भानावर येते त्यांनी राहुलची माफी मागितली. मुलीच्या पाठी खंबीर उभे राहणाऱ्या पित्याची भूमिका साकारताना त्यांनी हे कृत्य केले होते. अनिल यांनी या सीनला चित्रपटातील आपला बेस्ट सीन म्हटले होते.

राहुलचे मानले होते आभार
अनिल कपूर यांनी ट्विटरवर राहुल बोसचे कौतुक करताना लिहिले, 'कमलने त्याक्षणी मानवला जवळजवळ मारलेच होते. मात्र मी तुझ्याशिवाय हा सीन करु शकलो नसतो. राहुल बोस तुझे आभार, तुझ्या पाठिंब्याशिवाय हे शक्य झाले नसते,' असे अनिल यांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...