आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एव्हरग्रीन अभिनेते:अनिल कपूर यांचे ऑक्सिजन मास्क घालून वर्कआउट; चाहते म्हणाले- सर तुम्ही तुमच्या मुलापेक्षाही जास्त फिट!

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचे एव्हरग्रीन अभिनेते अनिल कपूर यांनी नुकतेच सोशल मीडियावर वर्कआउट करतानाचे व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत. व्हिडिओमध्ये 66 वर्षीय अनिल ऑक्सिजन मास्क घालून वर्कआउट करताना दिसत आहेच. या व्हिडिओमध्ये अनिल कपूर ऑक्सिजन मास्क लावून ट्रेडमिलवर धावत आहेत. 'फायटर मोड ऑन', असे कॅप्शन त्यांनी व्हिडिओला दिले आहे.

चाहत्यांनी अनिल यांच्या एनर्जीचे केले कौतुक
या व्हिडिओवर अनिल कपूर यांचे चाहते त्यांच्या फिटनेस आणि एनर्जीचे कौतुक करत आहेत. एका यूजरने व्हिडिओवर कमेंट करत म्हटले की, सर तुमचा फिटनेस तुमच्या मुलापेक्षाही चांगला असेल. आणखी एका चाहत्याने लिहिले, ऑलवेज ग्रीन!

काही लोकांनी अनिल कपूर यांनी घातलेल्या ऑक्सिजन मास्कवरही कमेंट केली आहे. 'जर ऑक्सिजन मास्कची गरज भासत आहे तर मग धावत का आहात?' असा प्रश्न एकाने केला आहे.

फिटनेस रूटीनची सुरुवात झोपेपासून होते - अनिल कपूर
अनिल कपूर अनेकदा फिटनेसशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. गेल्या वर्षी एका व्हिडिओमध्ये अनिल यांनी त्यांची फिटनेस रुटीन शेअर केले होते.

या व्हिडिओमध्ये त्याने सांगितले की, त्यांचे फिटनेस रूटीन सकाळपासून नव्हे तर रात्री झोपेपासून सुरू होते. दररोज सात तास झोप घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

डार्ट गेम खेळून दिवसाची सुरुवात होते, ट्रेनर सांगतो तसे मी करतो- अनिल
अनिल यांनी सांगितल्यानुसार, त्यांच्या दिवसाची सुरुवात डार्ट खेळाने होते. यामुळे त्यांचा फोकस आणि आणि एकाग्रता सुधारली. मी वर्कआउटने माझ्या दिनचर्येत संतुलन साधण्याचा प्रयत्न करतो, असे ते सांगतात.

अनिल पुढे सांगतात, 'मी तंदुरुस्त राहण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून मी कॅमेऱ्यासमोर चांगला दिसेन. माझा ट्रेनर मार्क माझ्यासाठी जे प्लान आखतो तेच मी करतो.'

अनिल पुढे सांगतात, 'व्यायाम आवश्यक आहेच पण त्याहीपेक्षा संतुलित आहार घेणे महत्त्वाचे आहे. अन्न चवीसाठी नाही तर ताकद आणि तग धरण्यासाठी खावे,' असे ते म्हणतात.

अनिल कपूर यांच्या चित्रपटांबद्दल सांगायचे तर ते शेवटचे राज मेहता यांच्या जुग जुग जियो या चित्रपटात नीतू कपूर यांच्यासोबत दिसले होते. आता अनिल लवकरच रणबीर कपूर, रश्मिका मंदाना आणि बॉबी देओल यांच्यासोबत संदीप रेड्डी वंगा यांच्या आगामी 'अ‍ॅनिमल'मध्ये दिसणार आहेत.