आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अभिनेत्री सोनम कपूर 35 वर्षांची झाली आहे. यानिमित्ताने तिचे वडील आणि अभिनेते अनिल कपूर यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. त्यांनी सोनमला आपला विश्वासू आणि अभिमान म्हटले आहे. सोनमचा जन्म 9 जून 1985 ला मुंबईत झाला होता.
अनिल यांनी लिहिले- माझी मुलगी माझा अभिमान
अनिल यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले, "मुलीसारखे दुसरे कुणी नाही. आनंद आहूजाचा परफेक्ट जोडीदार, पडद्यावरील एक स्टार आणि कल्पनाही करू शकत नाही अशी स्टाईल आयकॉन. ती माझी विश्वासू आहे, आनंद आहे, माझा अभिमान आहे. आणि मला माहित असलेली सर्वात उदार मनाची व्यक्ती (एकटी व्यक्ती जिची मला भीती वाटते.) आणि आता बोना फाइड शेफही आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सोनम कपूर. मला आज खूप आनंद झाला आहे की तू आज इथे आमच्या सगळ्यांसोबत आहेस. तुझ्यावर कायम प्रेम आहे."
सोनमशी संबंधित सुखद आठवण
असे म्हटले जाते की, कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात अनिल कपूर आणि त्यांचे कुटुंब राज कपूर यांच्या गॅरेजमध्ये राहत होते. मात्र कठोर परिश्रमामुळे अनिल यांनी लवकरच इंडस्ट्रीमध्ये नाव, प्रसिद्धी आणि पैसा कमावला. त्यांनी जुहूमध्ये स्वतःसाठी एक बंगला विकत घेतला, ज्याचे इंटिरियर पत्नी सुनीता यांनी डिझाइन केले होते. अनिल कपूर या बंगल्यात शिफ्ट झाले तेव्हा सोनम अवघ्या एक महिन्याची होती.
सोनमने मुंबईत 35 वा वाढदिवस साजरा केला
आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी सोनम कपूर एक दिवस आधीच दिल्लीहून मुंबईला आली होती. लॉकडाऊनमुळे ती दोन महिन्यांपासून दिल्लीत तिच्या सासरच्या घरी होती. सोनमने वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
यात घराच्या सजावटीपासून ते तिच्यासाठी बनवण्यात आलेल्या होम मेड केकची झलकदेखील दिसते.
आनंद आहूजाला जगातील सर्वोत्कृष्ट नवरा म्हटले
सोनमने सोशल मीडियावर पती आनंद आहूजासाठी एक थँक्स नोट लिहिली आहे. ती म्हणाली, "जगातील सर्वोत्कृष्ट नवरा, जो मला खरोखर आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी देतो. वाढदिवशी तो माझा आशीर्वाद आहे. लव्ह यू आनंद पहिल्या दिवसापासून..'
View this post on InstagramA post shared by Sonam K Ahuja (@sonamkapoor) on Jun 8, 2020 at 12:33pm PDT
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.