आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कन्फर्म:अभिनेता हर्षवर्धन कपूरने विकी कौशल आणि कतरिना कैफच्या नात्यावर केलं शिक्कामोर्तब, म्हणाला - 'हो... ते दोघे एकत्र आहेत'

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • याच आठवड्यात कतरिनाच्या घराबाहेर स्पॉट झाला होता विकी

अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफ रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा ब-याच काळापासून रंगतेय. परंतु, अद्याप दोघांनीही त्यांच्या नात्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. पण, आता हे दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्यावर अभिनेते अनिल कपूरचा यांचा मुलगा आणि अभिनेता हर्षवर्धन कपूरने शिक्कामोर्तब केले आहे.

विकी आणि कतरिना एकत्र आहेत आणि हे खरे आहे: हर्षवर्धन
एका मुलाखतीत हर्षवर्धनला विचारण्यात आले की, बॉलिवूडमधल्या कोणत्या कलाकार जोडीच्या अफेअरच्या चर्चांना तू खरे मानतो तसेच अशा कोणत्या जोड्या आहेत ज्या फक्त लोकप्रियता मिळवण्यासाठी आहेत? या प्रश्नाचे उत्तर देताना हर्षवर्धन म्हणाला, 'विकी आणि कतरिना एकत्र आहेत आणि हे खरे आहे.' त्यानंतर बावचळून पटकन म्हणाला, 'हे सांगून मी कोणत्या अडचणीत तर सापडणार नाहीये ना?'

याच आठवड्यात कतरिनाच्या घराबाहेर स्पॉट झाला होता विकी
याच आठवड्यात विकीला कतरिना कैफच्या घराबाहेर स्पॉट केले होते. विकीची कार कतरिनाच्या घराबाहेर अनेक तास उभी होती. यापूर्वीही हे दोघे अनेकदा एकत्र दिसले आहेत. आता हे दोघे स्वतः कधी आपल्या नात्याची कबुली देतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र हर्षवर्धनने केलेल्या गौप्यस्फोटानंतर विकी आणि कतरिनाच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

विकी आणि कतरिनाचे आगामी प्रोजेक्ट
वर्क फ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास कतरिना कैफ अक्षय कुमारसोबत ‘सूर्यवंशी’ या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टरसोबत ती 'फोन भूत'मध्येही दिसेल. सलमान खानसोबतचा 'टायगर 3' हा तिचा आणखी एक आगामी चित्रपट आहे. तर विकी कौशल 'द इम्मोर्टल अश्वत्थामा', 'सरदार उधम सिंग', 'सॅम मानेकशा'या चित्रपटांत झळकणार आहे.

बातम्या आणखी आहेत...