आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:ॲनिमेशनपट ‘टॉम अँड जेरी’ने दिले सिनेमाला जीवदान, एक वर्षानंतर पडद्यावर आला बालचित्रपट

मुंबई / मनीषा भल्ला14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जूनमध्ये प्रदर्शित होईल अमिताभचा चित्रपट ‘झुंड’

सुमारे एक वर्षानंतर भारतीय चित्रपटगृहात पुन्हा एकदा बालचित्रपट लागला आहे. १९ फेब्रुवारीला देशात हॉलीवूडचा लाइव्ह ॲक्शन ॲनिमेशन चित्रपट ‘टॉम अँड जेरी’ प्रदर्शित झाला. हॉलीवूड प्रॉडक्शन हाऊस वॉर्नर ब्रदर्सच्या या चित्रपटाच्या माध्यमातून मुलांमध्ये लोकप्रिय कार्टून कॅरेक्टर बिल्ला टॉम आणि उंदीर जेरी मोठ्या पडद्यावर अवतरत आहेत. दीर्घकाळापासून प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत असलेल्या भारतीय चित्रपटगृहांसाठी हा बालचित्रपट सुटकेचा श्वास घेऊनच आला आहे. इंग्रजी व चार भारतीय भाषांमध्ये देशातील ६०० स्क्रीन्सवर प्रदर्शित या चित्रपटाची ओपनिंग चांगली म्हटली जात आहे. चित्रपटाचे निर्माते वॉर्नर ब्रदर्सने अद्याप फुटकॉल किंवा कमाईचे अधिकृत आकडे दिलेले नाहीत. मात्र, चित्रपटाचा ट्रेलर आल्यानंतर लगेच मुंबईत आगाऊ बुकिंग सुरू झाली होती.

पहिल्या दिवशी बुकिंग फुल्ल झाली होती. बंगळुरू, हैदराबाद व चेन्नईतही चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, दिल्लीत प्रतिसाद कमी होता. सिनेपोलिस मल्टिप्लेक्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष कुणाल साहनी यांचे म्हणणे आहे की, चित्रपटाची कामगिरी अपेक्षेपेक्षा चांगली आहे. या आधी वॉर्नर ब्रदर्सने भारतात लाइव्ह अॅक्शन अॅनिमेशन चित्रपट ‘पोकेमॉन : डिटेक्टिव्ह पिकाचू’ प्रदर्शित केला होता. या चित्रपटाने भारतात चांगला व्यवसाय केला होता, तर ६ मार्च २०२० ला डिस्नेचा अॅनिमेशन चित्रपट ‘ऑनवर्ड’ आला होता. लॉकडाऊनआधी प्रदर्शित या चित्रपटाने एका आठवड्यात २.२५ कोटींचा व्यवसाय केला होता. ‘टॉम अँड जेरी’ची कामगिरी चांगली राहील असे चित्रपट समीक्षकांना वाटते. अॅनिमेशन सगळ्यांनाच आवडतो असे गिरीश वानखेडे यांचे मत आहे.

जूनमध्ये प्रदर्शित होईल अमिताभचा चित्रपट ‘झुंड’
मुंबई। यंदा अमिताभ बच्चनचे चित्रपट ‘झुंड’ आणि ‘चेहरे’ची प्रतीक्षा आहे. ‘झुंड’चे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी १८ जूनला प्रदर्शनाची घोषणा केली आहे. चित्रपटाची कथा क्रीडा शिक्षक विजय बासरे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. रिलायन्सचा ‘८३’ हा ४ जूनला प्रदर्शित होईल. ‘अंतरंगी र” ६ ऑगस्ट, २ एप्रिलला “बॅलबॉटम’ प्रदर्शित होत आहे. तसेच धाकड, मैदान, जर्सी, लाल सिंह चढ्‌ढादेखील सज्ज आहेत.

बातम्या आणखी आहेत...