आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराटीव्ही अभिनेत्री अनिता हसनंदानी दीर्घ विश्रांतीनंतर कामावर परतत आहे. मुलगा आरवच्या जन्मापासून अनिता छोट्या पडद्यापासून दूर आहे. अलीकडेच तिने सोशल मीडियाद्वारे नवीन प्रोजेक्टसाठी ऑडिशन देत असल्याची माहिती दिली. यासह कमबॅक करताना खूप त्रास होत असल्याचेही ती म्हणाली आहे.
अनिताने लिहिले भावनिक कॅप्शन
अनिताने तिचा मुलगा आरवसोबतचा एक फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले, 'ऑडिशनला जाण्यापूर्वी माझ्या मुलासोबतचे काही क्षण. कलाकारांचा संघर्ष खरा असतो. गर्भधारणेनंतर कामावर परतणे इतके अवघड असेल असे कधीच वाटले नव्हते. अजून मी काय सांगू शकते? मी सुरुवातीपासून पुन्हा नव्याने सुरुवात करू शकेल यासाठी मला शुभेच्छा द्या,' असे अनिता म्हणाली आहे.
2013 मध्ये झाले होते अनिताचे लग्न
अनिताने ऑक्टोबर 2013 मध्ये रोहित रेड्डीशी लग्न केले होते. ती गेल्या अनेक वर्षांपासून टीव्ही इंडस्ट्रीत काम करत आहे. 'ये है मोहब्बतें', 'काव्यांजली', 'नागिन'सह अनेक टीव्ही शोमध्ये ती झळकली आहे. 9 फेब्रुवारी 2021 रोजी अनिताने मुलगा आरवला जन्म दिला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.