आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हॅपी बर्थडे:39 वर्षांची झाली अनिता हसनंदानी, लॉकडाऊनमध्ये व्हिडिओ कॉलद्वारे केले सर्वांसमोर केक कटिंग

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अनिताचे पती रोहित रेड्डी यांनीही आपल्या इंस्टाग्राम स्टोरीतून काही व्हिडिओ शेअर केले आहेत.

अभिनेत्री अनिता हसनंदानी आज आपला 39 वा वाढदिवस साजरा करीत आहे. लॉकडाऊनने लोकांमध्ये अंतर निर्माण केले आहे, पण तंत्रज्ञानाच्या मदतीने लोक आपल्या निकटवर्तीयांच्या संपर्कात आहेत. अनिताचे मित्रही व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून तिच्या संपर्कात असून याद्वारे ते तिचा वाढदिवस खास बनवत आहेत. अनिताने लॉकडाऊनमधील सेलिब्रेशनची झलक शेअर केली असून त्यात ती व्हिडिओ कॉलद्वारे सर्वांसमोर केक कापताना दिसत आहे.

अनिताचे पती रोहित रेड्डी यांनीही आपल्या इंस्टाग्राम स्टोरीतून काही व्हिडिओ शेअर केले आहेत ज्यात अनिताचे जवळचे लोक आणि इंडस्ट्रीतील काही मित्र त्यांच्यासोबत व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संपर्कात असल्याचे दिसत आहेत. या सेलिब्रेशनमध्ये एकता कपूर, करण पटेल, पर्ल व्ही पुरी, नीना कुलकर्णी आणि क्रिस्टल डिसूझा यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी सहभागी झाले. 

  • नव-याने खास खीर बनवली

अनिताने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओही शेअर केला आहे, ज्यात पती रोहित रेड्डी तिचा हा दिवस खास बनवण्यासाठी तिच्यासाठी खीर बनवताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना अनिताने लिहिले, 'आज माझा वाढदिवस आहे आणि माझे पती माझ्यासाठी जगातील सर्वोत्कृष्ट खीर बनवित आहेत'.

  • 20 वर्षांपासून एंटरटेन्मेंट इंडस्ट्रीत आहे कार्यरत

अनिता हसनंदानी जवळपास 20 वर्षांपासून मनोरंजन क्षेत्रातील एक भाग आहे. तिने 'ताल' या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आणि त्यानंतर 'कृष्णा कॉटेज' आणि 'कुछ तो है' यासारख्या चित्रपटात ती झळकली. टेलिव्हिजन इंडस्ट्रीत 'हरे कांच की चुडिया' या मालिकेतून पदार्पण केल्यानंतर ती 'सौतान कभी सहेली', 'कसौटी जिंदगी की', 'सास भी कभी बहु थी' यासह अनेक हिट शोमध्ये दिसली आहे.

बातम्या आणखी आहेत...