आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दत्त कुटुंबातील कर्करोगाची पार्श्वभूमी:कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराशी झगडतोय संजय दत्त, 39 वर्षांपूर्वी आई नर्गिस आणि 24 वर्षांपूर्वी पत्नी ऋचाचा कर्करोगाने घेतला होता जीव

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
11 ऑगस्ट रोजी संजय दत्तल थर्ड स्टेजचा फुफ्फुसांचा कर्करोग झाल्याची बातमी आली. - Divya Marathi
11 ऑगस्ट रोजी संजय दत्तल थर्ड स्टेजचा फुफ्फुसांचा कर्करोग झाल्याची बातमी आली.
  • 1981 मध्ये पॅनक्रिएटिक कर्करोगाने नर्गिस यांचे निधन झाले होते. त्यावेळी संजय 22 वर्षांचा होता.
  • 1996 मध्ये संजय दत्तची पहिली पत्नी आणि त्याची मुलगी त्रिशालाची आई ऋचा शर्मा हिचेही कर्करोगाने निधन झाले होते.

61 वर्षीय अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसांच्या कर्करोगाचे निदान झाले असून त्याचा हा आजार थर्ड स्टेजमध्ये असल्याचे म्हटले जात आहे. दत्त कुटुंबात कर्करोगाची पार्श्वभूमी आहे. 39 वर्षांपूर्वीही कर्करोगामुळे संजयने आपली आई नर्गिसला गमावले होते. संजू बाबा नर्गिस यांचा अतिशय लाडका होता. 1981 मध्ये पॅनक्रिएटिक कर्करोगाने नर्गिस यांचे निधन झाले होते. त्यावेळी संजय फक्त 22 वर्षांचा होता.

नर्गिसच्या यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी झालेले सुनील दत्त आणि संजय दत्त
नर्गिसच्या यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी झालेले सुनील दत्त आणि संजय दत्त
  • 10 महिने दिला होता कर्करोगाशी लढा

2 ऑगस्ट 1980 रोजी अधिवेशनाच्या काळात नर्गिस आजारी पडल्या. सुरुवातीला, त्यांना कावीळ झाल्याचे निदान झाले होते. यानंतर, त्या मुंबईत परतल्या आणि येथील ब्रीचकँडी रुग्णालयात दाखल झाल्या. पण 15 दिवस त्यांच्या प्रकृतीत काहीच सुधारली नाही. आणि वजन देखील वेगाने कमी होत गेले. त्यानंतर त्यांना स्वादुपिंडाचा कर्करोग असल्याचे निदान झाले. नर्गिस यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये उपचार करण्यात आले. भारतात परत आल्यानंतरही त्यांच्या प्रकृतीत फारशी सुधारणा दिसून आली नाही. 2 मे 1981 रोजी त्या कोमामध्ये गेल्या. दुसर्‍याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला.

  • नर्गिस आपल्या मुलासाठी पत्र सोडून गेल्या होत्या

कर्करोगाचे निदान झाल्यानंतर त्यांना आपला मुलगा संजयची खूप काळजी लागली होती. जेव्हा त्या उपचारांसाठी अमेरिकेत गेल्या त्यावेळी त्यांनी सुनील दत्त यांना एक पत्र लिहून संजयबद्दल चिंता व्यक्त केली होती. त्यांनी लिहिले - 'संजय पुन्हा वाईट सवयींमध्ये अडकू नये याची काळजी घ्या.' 3 मे 1981 रोजी मुंबईत त्यांचे निधन झाले. त्यानंतर, 1982 मध्ये नर्गिस यांच्या स्मरणार्थ कर्करोगाच्या रुग्णांसाठी नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर फाउंडेशनची स्थापना केली गेली.

संजय दत्त आणि रिचा शर्मा यांची एक मुलगी असून त्रिशाला हे तिचे नाव आहे.
संजय दत्त आणि रिचा शर्मा यांची एक मुलगी असून त्रिशाला हे तिचे नाव आहे.
  • कर्करोगच पहिल्या पत्नीच्या मृत्यूचे कारण ठरले

संजय दत्तची पहिली पत्नी आणि त्याची मुलगी त्रिशालाची आई ऋचा शर्मा हिचेही कर्करोगाने निधन झाले. रिचाला ब्रेन ट्यूमर होता. 1987 मध्ये संजयसोबत तिचे लग्न झाले होते आणि लग्नाच्या दोन वर्षांतच तिला कर्करोगाचे निदान झाले होते. तिच्यावर लंडनमध्ये बराच काळ कर्करोगावर उपचार झाले. 1996 मध्ये कर्करोगामुळे ऋचाचे निधन झाले होते.

  • संजयने दोन महिन्यांपूर्वी व्हिडिओ पोस्ट केला होता

आई नर्गिस दत्त यांच्या 91 व्या जयंतीनिमित्त संजय दत्तने इंस्टाग्रामवर त्यांच्या आठवणीतील एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये, त्याच्या आईच्या जीवनातील अनेक महत्त्वाचे टप्पे दर्शविले गेले होते. हा व्हिडिओ पोस्ट करत संजयने लिहिले होते, वाढदिवसाच्या शुभेच्छा आई, मिस यू.

बातम्या आणखी आहेत...