आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाऊनमध्ये उत्सव:बिहू सण साजरा करण्यासाठी माहेरी जाऊ शकली नाही अंकिता कोंवर, पत्नीसाठी मिलिंद सोमणने घरीच खास बनवला सण

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मिलिंद सोमणची पत्नी अंकिता कोंवर मुळची आसामची रहिवासी आहे.

लॉकडाऊनमुळे लोकांना प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली आहे, त्यामुळे लोक घरीच सण साजरा करत आहेत. अलीकडेच मिलिंद सोमणने एका पोस्टद्वारे सांगितले की, त्याची पत्नी अंकिता बिहू सणाच्या निमित्ताने आपल्या माहेरच्या लोकांना खूप मिस करत होती. लॉकडाऊनमुळे ती बिहू सण साजरा करण्यासाठी गुवाहाटीला जाऊ शकली नाही. अशा परिस्थितीत मिलिंदने बिहू उत्सव साजरा करत पत्नीसोबत एग फाइट करुन तिला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला. 

मिलिंद सोमणने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक छायाचित्र शेअर केले आहे ज्यात दोघेही एग फाइट करताना दिसत आहेत. हा फोटो शेअर करताना मिलिंदने लिहिले की, 'जगाला हॅपी रंगोली बिहू. अंकिता गुवाहाटीमधील तिच्या माहेरच्या माणसांना खूप मिस करत होती, त्यामुळे आम्ही उत्सव साजरा करण्यासाठी एग फाइट केली. ही या सणाच्या निमित्ताने केली जाते. यासोबतच मिलिंदने सध्या आपल्या कुटुंबियांपासून दूर असलेल्या सर्वांना प्रोत्साहन दिले आहे. 

अंकितानेही तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एग फाइटचा बुमरॅंग शेअर केली आहे. यावेळी दोघेही ट्रेडिशनल अंदाजात दिसले.

बिहू हा सण आसामचे नवीन वर्ष मानले जाते. मिलिंद सोमणची पत्नी अंकिता कोंवर मुळची आसामची रहिवासी आहे. ती दरवर्षी आपल्या कुटुंबातील सदस्यांसह गुवाहाटीमध्ये बिहू उत्सव साजरा करत असते. यावर्षी लॉकडाऊनमुळे ती तिच्या घरी जाऊ शकली नाही, त्यामुळे दोघांनी मिळून एक मजेदार पारंपारिक खेळ खेळून हा सण साजरा केला. 

बातम्या आणखी आहेत...