आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दिल बेचारा रिलीज:सुशांतचा शेवटचा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी अंकिता लोखंडे झाली भावूक, पोस्टमध्ये लिहिले - ‘पवित्र रिश्तापासून दिल बेचारापर्यंत, एक आखिरी बार..’

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुशांतच्या आठवणीत अंकिता भावूक झाल्याचे दिसून आले आहे.

रिया चक्रवर्तीनंतर सुशांत सिंह राजपूतची एक्स गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने एक भावूक पोस्ट शेअर करुन आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. सुशांतचा शेवटचा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी अंकिताने सोशल मीडियावर चित्रपटाचे एक मोशन पोस्टर शेअर करुन त्याला भावनिक कॅप्शन दिले आहे. ‘पवित्र रिश्तापासून दिल बेचारापर्यंत, एक आखिरी बार..’ , असे कॅप्शन तिने दिले आहे.

View this post on Instagram

From #pavitrarishta to #dilbechara One last time !!!

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita) on Jul 24, 2020 at 6:53am PDT

  • 3 वर्षांपूर्वी झाले होते ब्रेकअप

सुशांत आणि अंकिता यांचे तीन वर्षांपूर्वी ब्रेकअप झाले होते. त्यानंतर या दोघांनीही आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून एकमेकांचे फोटो डिलीट केले होते. अंकिताने सुशांतच्या मृत्यूनंतर देवा-यात दोन वेळा सुशांतच्या नावाने दिवा लावून त्याच्यासाठी प्रार्थना केली होती.

  • सुशांत आत्महत्या प्रकरणात सीबीआय चौकशी सुरू करण्याची मागणी

मुकेश छाबरा दिग्दर्शित ‘दिल बेचारा’ हा चित्रपट ‘द फॉल्ट इन अवर स्टार्स’चा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात सुशांतसह संजना सांघी मुख्य भूमिकेत आहे. सुशांतने 14 जून रोजी मुंबईतील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मुंबई पोलिसांनी सुशांत आत्महत्या प्रकरणात आतापर्यंत 40 जणांची चौकशी केली आहे. तर अनेक दिग्गज कलाकार आणि राजकारण्यांनीही सुशांतच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.