आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अंकिताने लिहिली मन की बात:रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर अंकिताला मिळाला दिलासा, म्हणाली -  'सत्याचा विजय'

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अटकेच्या भीतीने घरातून गायब झाली होती रिया

अभिनेता सुशांत सिंह राजपूतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने सोशल मीडियावर व्यक्त केलेल्या भावनांमुळे तिच्या मनातील गोष्ट समोर आली आहे. सुशांतच्या कुटुंबीयांनी त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिच्याविरोधात दाखल केलेल्या तक्रारीनंतर अंकिताने तिच्या इंस्टाग्राम अकाउंवर 'सत्याचा विजय', असे लिहिले आहे. अंकिता आणि सुशांतचे तीन वर्षांपूर्वी ब्रेकअप झाले होते. त्यानंतर रिया त्याच्या आयुष्यात आली होती.

  • अटकेच्या भीतीने घरातून गायब झाली होती रिया

सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीवर काही गंभीर आरोप केले असून पाटणा येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर रियावर अटकेची टांगती तलवार आहे. सुशांतचे वडील के.के. सिंह यांनी तक्रारीत रिया चक्रवर्तीने सुशांतकडून पैसे घेतल्याचा आरोप केला आहे. तसंच सुशांतला ब्लॅकमेल केल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

सुशांतच्या वडिलांच्या तक्रारीनंतर पाटण्याच्या राजीव नगर पोलिस ठाण्यात कलम 341, 342, 280, 420, 406, 420 आणि 306 अंतर्गत रिया, तिचे आईवडील आणि भावासह दोन मॅनेजरवर गुन्हा दाखल झाला आहे. बुधवारी पाटणा पोलिस रियाची चौकशी करण्यासाठी तिच्या मुंबईतील घरी पोहोचले होते. मात्र तिथे रिया किंवा तिच्या कुटुंबातील कुणीही हजर नव्हते.