आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांतच्या आठवणीत भावूक झाली अंकिता:म्हणाली- माझ्यासाठी तो सर्वस्व होता, मला खात्री आहे तो कुठेही असला तरी खूप आनंदी असेल

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

'डीआडी सुपर मॉम्स 3' या डान्स रिअॅलिटी शोचा नवीन प्रोमो नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. या शोच्या आगामी भागात अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि उषा नाडकर्णी स्पेशल गेस्ट म्हणून सहभागी होणार आहेत.

या प्रोमोमध्ये एका स्पर्धकाने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतला आपल्या सादरीकरणातून श्रद्धांजली वाहिली आहे. या परफॉर्मन्सदरम्यान सुशांतचा फोटोही दिसला. सुशांतचा फोटो बघून अंकिता आणि उषा नाडकर्णी खूप भावूक झालेल्या या व्हिडिओत दिसत आहेत.

शोमध्ये अंकिता तिच्या आणि सुशांतच्या नात्याबद्दलही बोलली. सुशांतच्या आठवणीत भावूक झालेली अंकिता म्हणाली, "तो माझा खूप जवळचा मित्र होता. तो सर्वस्व होता. मला खात्री आहे की तो कुठेही असला तरी तो खूप आनंदी असेल." यावेळी अंकिता आणि उषा नाडकर्णी यांचे डोळे पाणावलेले दिसले.

14 जून 2020 रोजी सुशांत सिंहचे वयाच्या 34 व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी सुशांत मृतावस्थेत आढळला होता. 'पवित्र रिश्ता' या मालिकेच्या सेटवर अंकिता आणि सुशांत दोघांचे सूत जुळले होते. हे दोघे सहा वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिले होते. मात्र 2016 मध्ये दोघांचे ब्रेकअप झाले होते. अंकिताला या ब्रेकअपमधून सावरायला बराच वेळ लागला होता. अलीकडेच अंकिता विकी जैनसोबत विवाहबद्ध झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...