आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सुशांतच्या निधनाला एक महिना पूर्ण:अंकिता लोखंडे सोशल मीडियावर परतली, सुशांतच्या स्मृतीप्रित्यर्थ देवाऱ्यात लावलेल्या दिव्याचा फोटो केला शेअर 

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 14 जून रोजी सुशांतने मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतला या जगाचा निरोप घेऊन आज (14 जुलै) एक महिना उलटला आहे. आता तो या जगात नाही, यावर अद्याप त्याचे चाहते आणि जवळच्या मित्रांचा  विश्वास बसत नाहीये. सुशांतच्या मृत्यूने त्याची एक्स-गर्लफ्रेंड  अंकिता लोखंडेलादेखील जबर धक्का बसला. तब्बल एक महिन्यानंतर अंकिताने त्याच्या मृत्यूवर प्रतिक्रिया दिली आहे.  

सुशांतच्या मृत्यूनंतर ती सोशल मीडियावर सक्रीय नव्हती, परंतु एका महिन्यानंतर ती सोशल मीडियावर परतली आहे. अंकिताने महिन्याभरानंतर तिची पहिली पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. या पोस्टद्वारे तिने आपले दुःख व्यक्त केले आहे. 

अंकिताने इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो तिच्या घरातील देवा-याच्या असून येथए दिवा लावलेला दिसत आहे. अंकिताने सुशांतच्या स्मरणार्थ हा दिवा देवासमोर ठेवला आहे. अंकिताने या फोटोच्या कॅप्शनमध्ये 'चाइल्ड ऑफ गॉड' (देवाचा मुलगा) असे लिहून सुशांतला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.  

अंकिताची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. एका यूजरने अंकिताच्या या पोस्टवर कमेंट करताना लिहिले, 'एसएसआर' म्हणजे सुशांत सिंह राजपूत. आणखी एका यूजरने लिहिले, 'तुला खूप प्रेम'.

View this post on Instagram

CHILD Of GOD 😇

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita) on Jul 13, 2020 at 8:15pm PDT

 

अंकिताला बसला जबर धक्का : सुशांतच्या मृत्यूची बातमी ऐकून अंकिताला मोठा धक्का बसला होता. पवित्र रिश्ता या मालिकेत अंकिता आणि सुशांतसोबत काम केलेल्या अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिने अंकिताविषयी एका वृत्तपत्राला सांगितले होते की, "अंकिता खूपच वाईट अवस्थेत आहे आणि ती फक्त रडतच आहे." सुशांतच्या मृत्यूनंतर अंकिता त्याच्या कुटुंबाला भेटण्यासाठी पाटण्याला गेली होती.

अंकिता-सुशांत 6 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते: 'पवित्र रिश्ता' या मालिकेच्या सेटवर अंकिता आणि सुशांत यांच्यात सुत जुळले होते. हे दोघे सहा वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिले होते. मात्र 2016 मध्ये दोघांचे ब्रेकअप झआले होते. अंकिताला या ब्रेकअपमधून सावरायला बराच वेळ लागला होता. आता ती विकी जैन नावाच्या उद्योगपतीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. तर अंकितापासून वेगळे झाल्यानंतर सुशांतचे नाव कृती सेननसोबत जुळले होते. त्यानंतर तो रिया चक्रवर्तीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा होती.