आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Ankita Lokhande Is Going To Marry Boyfriend Vicky Jain In The Second Week Of November, Instead Of Destination Wedding, She Will Take Rounds In Mumbai.

वेडिंग बेल्स:डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात बॉयफ्रेंड विकी जैनसोबत लग्न करणार अंकिता लोखंडे, डेस्टिनेशन वेडिंगऐवजी मुंबईत होणार लग्नसोहळा

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अंकिता-विकी डेस्टिनेशन वेडिंग करणार नाहीत

'पवित्र रिश्ता' फेम अभिनेत्री अंकिता लोखंडे लवकरच तिचा प्रियकर विकी जैनसोबत लग्न करणार आहे. हे लग्न डिसेंबरच्या दुस-या आठवड्यात होणार असल्याचे वृत्त आहे. दोघांनी त्यांच्या लग्नाची तयारी सुरू केली असून जवळच्या नातेवाईक आणि मित्रांना आमंत्रण पाठवण्यास सुरुवात केली आहे.

अंकिता-विकी डेस्टिनेशन वेडिंग करणार नाहीत

अलीकडेच आलेल्या ई-टाइम्सच्या वृत्तानुसार, अंकिता लोखंडे आणि विकी जैन हे डेस्टिनेशन वेडिंग करणार नाहीत, दोघेही बॉलिवूडचा ट्रेंड फॉलो करणार नाहीत. बातमीनुसार, मुंबईतच एका खासगी समारंभात हे दोघे लग्न करणार आहेत. या सोहळ्यासाठी शहरातील 5 स्टार हॉटेलचा शोध घेतला जात आहे.

या तारखांना होऊ शकतो विवाह

बातमीनुसार, अंकिता-विकी 12, 13, 14 डिसेंबर यापैकी एका दिवशी सप्तपदी घेणार आहेत. आत्तापर्यंत, कोणत्याही तारखेची पुष्टी झालेली नाही. आज सकाळी या दोघांनी अनेक परिचितांना फोन आणि मेसेज करून लग्नाची माहिती दिली आहे.

हे सेलिब्रिटी देखील थाटणार लग्न
अंकिता-विकीशिवाय बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव आणि त्याची गर्लफ्रेंड पत्रलेखाही नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात लग्न करणार आहेत. दोघांच्या घरी लग्नाची तयारी सुरू झाली आहे. विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या लग्नाच्या बातम्याही चर्चेत आहेत, मात्र कतरिनाने या बातम्या अफवा असल्याचे म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...