आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'पवित्र रिश्ता' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडेने कंगना रनोटच्या ‘मणिकर्णिका’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पाऊल ठेवले होते. मात्र त्यानंतर ती कोणत्याच चित्रपटात दिसली नाही. आता अंकिताने बॉलिवूडमध्ये काम मिळत नसल्याची खंत व्यक्त केली आहे. अंकिताने सांगितल्यानुसार, तिचा गॉडफादर नाही. ती टॅलेंटेड आहे, पण नकार द्यायला तिच्याकडे कामच येत नाही.
माझा गॉडफादर नाही
अंकिता लोखंडेने ‘मणिकर्णिका’ या चित्रपटात कंगना रनोटसोबत काम केले होते. या चित्रपटात तिने ‘झलकारी बाई’ची भूमिका साकारली होती. पण, त्यानंतर मात्र तिला पुन्हा हिंदी चित्रपटात भूमिकाच ऑफर झाली नाही. मणिकर्णिकानंतर माझ्या हातात एकही संधी नाही, असे अंकिता सांगते.
ती म्हणाली, 'मार्केट खूप वेगळे आहे आणि लोक म्हणतात की त्यांना चांगल्या ऑफर्स मिळत नाहीत, माझ्या बाबतीत असे काहीही झाले नाही. माझ्याकडे अशी कोणतीही ऑफर नाही जी मी नाकारू शकेन आणि मी बाहेर जाऊन लोकांकडे स्वतःहून काम मागू शकत नाही."
'पवित्र रिश्ता' या मालिकेमुळे मिळाली ओळख
अंकिता लोखंडे 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून घराघरांत पोहोचली. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबतची तिची जोडी चांगलीच गाजली. या मालिकेदरम्यानच दोघे रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, काही वर्षे डेटिंग केल्यानंतर दोघांचे ब्रेकअप झाले.
2019 मध्ये अंकिताने कंगनाच्या मणिकर्णिका या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल करू शकला नाही. त्यानंतर 2021 मध्ये अंकिताने बिझनेसमन विकी जैनसोबत लग्न केले. अंकिता चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये आता फारशी सक्रिय नाही, पण सोशल मीडियावर ती बरीच अॅक्टिव असून तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.