आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अंकिताने खोडला रियाचा दावा:रिया म्हणाली, सुशांत 2013 पासून नैराश्यात होता; अंकिताचा खुलासा - 'आम्ही 23 फेब्रुवारी 2016 पर्यंत एकत्र होतो तोपर्यंत सुशांत नैराश्यात नव्हता'

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अंकिताने रिया चक्रवर्तीचे अनेक दावे खोटे ठरवले आहेत.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या रहस्यमय मृत्यूनंतर त्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीकडे या प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून बघितले जात आहे. या प्रकरणी शुक्रवारी रियाची सीबीआयकडूनही चौकशी होत आहे. दरम्यान या चौकशीपूर्वी रियाने ‘इंडिया टुडे’ला मुलाखत देऊन तिच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले आहेत.

  • रियाचा काय आहे दावा?

या मुलाखतीत रियाने दावा केला की, सुशांत 2013 पासून नैराश्यात होता. मात्र तिचा हा दावा सुशांतची पुर्वाश्रमीची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री अंकिता लोखंडेने हिने खोडून काढला आहे. मी आणि सुशांत 2016 पर्यंत एकत्र होतो आणि तोपर्यंत तो अगदी बरा होता, असे अंकिताने इंस्टाग्रामवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे. सोबतच अंकिता ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी सुशांतच्या संपर्कात होती असेही रियाने मुलाखतीत म्हटले. तिचा हा दावादेखील अंकिताने खोटा ठरवला आहे.

  • सुशांत 2016 पर्यंत अगदी बरा होता - अंकिता लोखंडे

अंकिता लोखंडेने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे, 'मी आणि सुशांत 23 फेब्रुवारी 2016 पर्यंत एकत्र होतो. या काळात त्याला कधीही डिप्रेशनचा त्रास झाला नाही. तसेच त्याने कोणत्याही मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचारही घेतले नाही. तो अगदी व्यवस्थित होता.'

  • सुशांत आणि माझ्यात फोनवर कधीच बोलणे झाली नव्हते

अंकिता पुढे म्हणते, 'मी आणि सुशांत आम्ही वेगळे झाल्यानंतरही संपर्कात होतो, असे मी कधीही कोठेही म्हटलेले नाही,. खरंतर मी असे म्हटले होते की, मणिकर्णिका चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान सुशांतने एका मित्राच्या इंस्टाग्रावर माझ्या एका पोस्टरवर कमेंट केली होती. त्याने मला माझ्या नव्या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. त्याला प्रतिसाद म्हणून मी त्यावर कमेंट केली होती. त्यामुळे रियाने म्हटल्याप्रमाणे आम्ही फोनवर बोललो हा दावा मी खोडते.'

  • रिया आणि सुशांतच्या नात्याविषयी माझी कधीच काही हरकत नव्हती

अंकिताने आपल्या आतापर्यंतच्या मुलाखतींमध्ये काय म्हटले आहे, हे तिने आपल्या पोस्टमध्ये सांगितले आहे. ती लिहिले, "मी माझ्या मुलाखतींमध्ये असेच म्हटले आहे की मी आणि सुशांत एकत्र होतो तोपर्यंत तो नैराश्यात नव्हता. आम्ही दोघांनी त्याच्या यशासाठी एकत्र स्वप्न पाहिली. त्याच्या यशासाठी मी प्रार्थना केली आणि तो यशस्वी झाला. मी हेच म्हटलं आहे. मला जेव्हा रिया आणि सुशांतसोबतच्या नात्याविषयी विचारले तेव्हा मी अगदी प्रामाणिकपणे हेच सांगितले आहे की मी तिला ओळखत नाही आणि त्यांच्या नात्याविषयी माझी काही हरकत नाही. माझी हरकत तेव्हा आहे जेव्हा एक व्यक्ती त्याचा जीव गमावतो. मला जर आम्ही सोबत असतानाच्या वेळी काय घडले याविषयी प्रश्न विचारण्यात आले तर मी अगदी प्रामाणिकपणे उत्तर देईल आणि जे सत्य आहे तेच सांगेल', असे अंकिता म्हणाली आहे.

  • शेवटपर्यंत सुशांतच्या कुटुंबीयांची साथ देईल

अंकिताने आपल्या फ्लॅटविषयीच्या पुराव्यांचाही या पोस्टमध्ये उल्लेख करुन सुशांतच्या कुटुंबीयांसोबत कायम उभे राहणार असल्याचे म्हटले आहे. अंकिता याविषयी म्हणाली, 'माझ्या फ्लॅटविषयी मी आधीच अनेक गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. सुशांतच्या कुटुंबाला देखील माझ्याविषयी काही आक्षेप नाही. मी पुरावे आणि सत्याच्या बाजूने आहे आणि म्हणूनच सुशांतच्या घरच्यांसोबत आहे, रियासोबत नाही. सुशांतच्या कुटुंबीयांच्या मते रिया त्या व्यक्तींपैकी आहे ज्यामुळे सुशांत आज आपल्यात नाही. त्यांच्याकडे तसे चॅट आणि इतर पुरावे आहेत ते नाकारता येणार नाहीत. मी देखील ते पाहिले आहे. त्यामुळे मी सुशांतच्या कुटुंबाची बाजू ऐकून त्यांच्या बाजूने आहे आणि शेवटपर्यंत त्यांची साथ देईल', असे अंकिताने आपल्या पोस्टमधून स्पष्ट केले आहे.