आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इमोशनल:सुशांतच्या मृत्यूनंतर सतत टीकेला सामोरे जात असलेल्या बॉयफ्रेंडला अंकिताने म्हटले सॉरी, लिहिले - 'माझ्यामुळे तुझ्यावर टीका झाली याबद्दल मी माफी मागते'

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'शब्द अपुरे पडतील. पण ही बाँडिंग अदभूत आहे. मी तुझ्यावर प्रेम करते', अशा शब्दांत अंकिताने विकीविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

अभिनेत्री अंकिता लोखंडेने हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर बॉयफ्रेंड विकी जैनबद्दल एक पोस्ट लिहून कृतज्ञतेची भावना व्यक्त केली आहे. विकीसोबतचा एक फोटो शेअर करुन तिने त्याला आपली सपोर्ट् सिस्टिम असल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे.

आपल्या भावना व्यक्त करताना अंकिताने लिहिले, ''तुझ्याबद्दल भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीयत. मी आपल्या दोघांना एकत्र पाहते, तेव्हा माझ्या मनात एक विचार येतो. मित्र, जोडीदार म्हणून तुला माझ्या आयुष्यात पाठवल्याबद्दल मी नेहमी देवाची आभारी राहीन'', असे ती म्हणाली आहे.

आपल्यामुळे टीका सहन करावी लागली, याबद्दल तिने विकीची माफीसुद्धा मागितली आहे. ती लिहिते, ''माझ्यासाठी तू नेहमी उभा आहेस, याबद्दल मनापासून आभारी आहे. माझ्या सगळया समस्या तू तुझ्या केल्या आणि गरज असताना मला मदत केल्याबद्दल थँक्यू. तू माझी सपोर्ट सिस्टिम आहेस, माझी परिस्थिती आणि मला समजून घेतल्याबद्दल मी विशेष करुन तुझी आभारी आहे. तू टीकेला पात्र नव्हतास, पण माझ्यामुळे तुझ्यावर टीका झाली याबद्दल मी माफी मागते'', असे अंकिताने तिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

विकीवर होतोय टीका
14 जून 2020 रोजी सुशांत सिंह राजपूतने गळफास घेऊन आत्महत्या केली. तेव्हापासून सोशल मीडियावर नेटकरी विकीवर निशाणा साधत तिच्यावर टीका करत आहेत. त्यानंतर विकीने इन्स्टाग्रामवरील कमेंट सेक्शन बंद केले. तसं पाहता विकी सोशल मीडियावर फारसा अॅक्टिव नाहीये. मात्र जुन्या पोस्टवर कमेंट करुन नेटकरी त्याच्यावर टीका करत आहेत.

  • सुशांतपासून विभक्त झाल्यानंतर विकीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे अंकिता

सुशांत आणि अंकिता सहा वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. मात्र 2016 मध्ये दोघांचे ब्रेकअप झाले होते. त्यानंतर काही वर्षांनी मुंबईतील बिझनेसमन विकी जैन अंकिताच्या आयुष्यात आला. अंकिता विकीसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. यावर्षीच्या अखेरपर्यंत दोघे लग्नाचे प्लानिंग करणार असल्याची चर्चा आहे.