आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या बॉयफ्रेंड विकी जैनसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आहे. अलीकडेच तिने विकीसोबत दिवाळी साजरी करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले करुन चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. अंकिताचे हेे सेलिब्रेशन सुशांतच्या चाहत्यांना मात्र फारसे आवडले नाही. आणि ट्रोलर्सनी तिच्या फोटो आणि व्हिडिओवर कमेंट करुन तिला ट्रोल केले. “तू एसएसआरला (सुशांत सिंह राजपूत) विसरलीस का?”, असा प्रश्न एका नेटकऱ्याने तिला विचारला आहे.
“जस्टीस फॉर एसएसआरचे काय?”, असा प्रश्न आणखी एका नेटक-याने तिला विचारला. एकाने तर “तुला पाहिल्यावर एसएसआरची आठवण येते”, असे म्हटले.
आणखी एका नेटक-याने तिला म्हटले की, “सुशांतला नेहमी मनात ठेव, त्याला विसरू नको.”
सुशांतसोबत ब्रेकअपनंतर विकीची एन्ट्री झाली
सुशांत आणि अंकिता 6 वर्षे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते. पण 2016 मध्ये दोघांचे ब्रेकअप झाले. काही वर्षानंतर मुंबईतील बिझनेसमन विकी जैन अंकिताच्या आयुष्यात आला. अंकिता नेहमीच विकीबरोबरचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. या वर्षाच्या अखेरीस दोघांचे लग्न होणार असल्याचे वृत्त आहे.
14 जून रोजी झाला होता सुशांतचा मृत्यू
14 जून 2020 रोजी सुशांत त्याच्या मुंबईतील राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता. पोलिसांनी प्रथमदर्शनी त्याने आत्महत्या केल्याचे म्हटले होते. मात्र नंतर त्याचा मृत्यू संशयास्पद असल्याचे म्हटले गेले आणि या प्रकरणाची सध्या सीबीआय चौकशी सुरु आहे. या प्रकरणी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिला तुरुंगातही जावे लागले होते. 28 दिवस तुरुंगात घालवल्यानंतर रिया सध्या जामिनावर बाहेर आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.