आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रियाचा दावा खोटा?:अंकिता लोखंडेने व्हिडिओ शेअर करुन सुशांतला 'क्लॉस्ट्रोफोबिया' असल्याचे नाकारले, लिहिले- तुला नेहमीच उडायचे होते आणि तू ते करून दाखवले

मुंबई5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रिया चक्रवर्तीने दावा केला की, सुशांतला क्लॉस्ट्रोफोबिया होता.

अभिनेता सुशांत सिंग राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने अलीकडेच एका मीडिया हाऊसला दिलेल्या मुलाखतीत सुशांतला क्लॉस्ट्रोफोबिया होता, असा दावा केला आहेमात्र सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे हिने सुशांतचा विमान चालवताना एक व्हिडिओ शेअर करुन रियाचा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे.

अंकिता लोखंडेने शेअर केलेल्या 1 मिनिटे 56 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये सुशांत विमानाच्या कॉकपिटमध्ये पायलटच्या सीटवर बसलेला दिसत आहे. अंकिताने व्हिडिओ शेअर करुन लिहिले, ‘हे क्लॉस्ट्रोफोबिया claustrophobia आहे का? तुला नेहमीच विमान उडवायचे होते आणि तू ते करून दाखवले. आम्हाला तुझा अभिमान आहे.’

  • रिया म्हणाली- सुशांतला 'क्लॉस्ट्रोफोबिया' होता

यापूर्वी बुधवारी रिया चक्रवर्तीने इंडिया टुडे न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, सुशांतला फ्लाइटमध्ये बसण्यास भीती वाटायची. रियाच्या म्हणण्यानुसार, 'ही भीती दूर करण्यासाठी तो मोडाफिनिल नावाचे औषध घेत असे. हे औषध त्याला हरेश शेट्टी नावाच्या मानसोपचार तज्ञाने दिले होते. हे औषध तो कायम आपल्या जवळ बाळगायचा', असा दावा रियाने केला आहे.

नेटक-यांनी रियाला म्हटले खोटारडी अंकिताच्या ट्विटवर प्रतिक्रिया व्यक्त करताना अनेक नेटक-यांनी सुशांतचे असे फोटो, व्हिडिओ आणि मुलाखतही शेअर केल्या आहेत ज्यात तो विमान उडवून चंद्रावर जाण्याविषयी बोलत आहेत. व्हिडिओ आणि फोटो शेअर करून सुशांतच्या चाहत्यांनी रियाचा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser