आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेडिंग बेल्स:विकी जैनसोबत लवकरच लग्न करणार अंकिता, होऊ शकते डेस्टिनेशन वेडिंग; सुशांतविषयी म्हणाली - आवडता सहकलाकार

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुशांतसोबत ब्रेकअपनंतर विकीसोबत रिलेशनशिपमध्ये अंकिता

अंकिता लोखंडे सध्या विकी जैनसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. एका मुलाखतीत तिने विक्कीसोबत लवकरच लग्न करणार असल्याचे सांगितले. ती म्हणाली, 'लग्न ही खूप सुंदर भावना आहे. लवकरच आमचे लग्न होणार आहे. त्यामुळे मी आनंदी आहे. मला जयपूर-जोधपुर या ठिकाणी डेस्टिनेशन वेडिंग आवडतं, मात्र माझ्या लग्नाबाबत ते कुठे होईल, हे अजून काही ठरवलेले नाही.'

प्रेमाविषयी अंकिता म्हणते, 'प्रेम माझ्यासाठी खूप गरजेचे आहे. मला प्रत्येक ठिकाणी प्रेम पाहिजे. ज्या प्रकाे मी जे खाते, मी जेथे जाते किंवा काही घेते, तेथे माझ्यासाठी प्रेम असायला हवे.' अंकिता आणि विकी मागील तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. गेल्याच महिन्यात त्यांच्या रिलेशनशिपला तीन वर्षे पूर्ण झाली, यानिमित्ताने दोघांनी एक सेलिब्रेशनदेखील केले होते.

अंकिताला दिवंगत एक्स बॉयफ्रेंड सुशांत सिंहविषयी विचारले. यावर ती म्हणाली, सुशांत आजही माझा आवडता को-स्टार आहे. रिलेशनशिपमध्ये तुला काय सहन होणार नाही, असे विचारले असता, ती म्हणाली, मी रिलेशनशिपमध्ये खोटेपणा सहन करु शकत नाही. तुम्ही माझ्याशी खोटे बोलले तर मी त्याचा तपास करेल.

विकी म्हटले होते सपोर्ट सिस्टम
अंकिता लोखंडेने काही महिन्यांपूर्वी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर बॉयफ्रेंड विकी जैनबद्दल एक पोस्ट लिहून कृतज्ञतेची भावना व्यक्त केली आहे. विकीसोबतचा एक फोटो शेअर करुन तिने त्याला आपली सपोर्ट् सिस्टिम असल्याचे पोस्टमध्ये म्हटले होते.

आपल्या भावना व्यक्त करताना अंकिताने लिहिले होते, ''तुझ्याबद्दल भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीयत. मी आपल्या दोघांना एकत्र पाहते, तेव्हा माझ्या मनात एक विचार येतो. मित्र, जोडीदार म्हणून तुला माझ्या आयुष्यात पाठवल्याबद्दल मी नेहमी देवाची आभारी राहीन'', असे ती म्हणाली.

आपल्यामुळे टीका सहन करावी लागली, याबद्दल तिने विकीची माफीसुद्धा मागितली आहे. ती लिहिते, ''माझ्यासाठी तू नेहमी उभा आहेस, याबद्दल मनापासून आभारी आहे. माझ्या सगळया समस्या तू तुझ्या केल्या आणि गरज असताना मला मदत केल्याबद्दल थँक्यू. तू माझी सपोर्ट सिस्टिम आहेस, माझी परिस्थिती आणि मला समजून घेतल्याबद्दल मी विशेष करुन तुझी आभारी आहे. तू टीकेला पात्र नव्हतास, पण माझ्यामुळे तुझ्यावर टीका झाली याबद्दल मी माफी मागते'', असे अंकिताने तिच्या पोस्टमध्ये म्हटले होते.

विकीवर झाली होती टीका
14 जून 2020 रोजी सुशांत सिंह राजपूतने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तेव्हापासून सोशल मीडियावर नेटकरी विकीवर निशाणा साधत त्याच्यावर टीका करत असतात. त्यानंतर विकीने इन्स्टाग्रामवरील कमेंट सेक्शन बंद केले होते. तसं पाहता विकी सोशल मीडियावर फारसा अॅक्टिव नाहीये. मात्र जुन्या पोस्टवर कमेंट करुन नेटकरी त्याच्यावर टीका करत होते.

सुशांतसोबत ब्रेकअपनंतर विकीसोबत रिलेशनशिपमध्ये अंकिता
'पवित्र रिश्ता' या मालिकेच्या सेटवर अंकिता आणि सुशांत यांच्यात सुत जुळले होते. हे दोघे सहा वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिले होते. मात्र 2016 मध्ये दोघांचे ब्रेकअप झाले होते. अंकिताला या ब्रेकअपमधून सावरायला बराच वेळ लागला होता. त्यानंतर तिच्या आयुष्यात मुंबईतील बिझनेसमन विकी जैन आला. अंकिता विकीसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

बातम्या आणखी आहेत...