आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खुलासा:सुशांतसाेबत लग्न करण्यासाठी “रामलीला’ सारखे चित्रपट सोडले, अंकिता लोखंडेचा खुलासा

24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुशांतसिंह राजपूतसोबत लग्न करण्यासाठी मी फराह खानचा “हॅप्पी न्यू इयर’, भन्साळीचा “बाजीराव मस्तानी’ आणि “रामलीला’सारखे मोठे चित्रपट सोडले होते, असा खुलासा अंकिता लोखंडेने केला. एका मुलाखतीत तिने सांगितले, सुशांत आणि मी लग्न करणार होतो. यासाठी मी बऱ्याच गोष्टी सोडल्या होत्या. मला आठवतेय, फराह खान मॅम माझ्याकडे “हॅप्पी न्यू इयर’ची ऑफर घेऊन आल्या होत्या.

मी शाहरुख खान सरांनाही भेटले होते. मात्र माझ्या डोक्यात दुसरे सुरू होते. याशिवाय भन्साळी सरांनीदेखील मला “बाजीराव मस्तानी’ ऑफर केले होते. पण मला लग्न करायचे, सर म्हणून नकार दिला होता, असे ती म्हणाली.

बातम्या आणखी आहेत...