आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंकिताच्या चेह-यावर फुलले हसू:जुळ्या मुलांचा फोटो शेअर करत अंकिता लोखंडे म्हणाली - 'नव्या आयुष्याची सुरुवात'

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • वर्षा जैन ही अंकिताची होणारी नणंद आहे.

अभिनेत्री अंकिता लोखंडे हिच्या घरी जुळ्या पाहुण्यांचं आगमन झालं आहे. अंकिताचा होणारा नवरा विकी जैनची बहीण वर्षा जैनने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. अंकिताने या जुळ्या मुलांचा फोटो शेअर करुन नव्या आयुष्याची सुरुवात झाल्याचे सांगितले आहे.

  • अबीर आणि अबिरा आहेत जुळ्या मुलांची नावे

अंकिताने हा फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. यात ती जुळ्या मुलांसोबत दिसतेय. यापैकी एक मुलगा आणि एक मुलगी आहे. अबीर आणि अबिरा अशी त्यांची नावे आहेत. ''आमच्या कुटुंबात पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. एका नव्या आयुष्याची सुरुवात झाली आहे. या जुळ्यांच्या जन्मामुळे आमचं कुटुंब आणखी मोठं झालंय. अबीर आणि अबीरा तुम्हा दोघांचं स्वागत..'', अशी पोस्ट अंकिताने शेअर केली आहे.

  • वर्षाच्या जवळ आहे अंकिता

अंकिता 4 वर्षांपासून विक्कीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. विकीची बहीण वर्षाचे व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या अभिषेक श्रीवास्तवशी लग्न झाले आहे. अंकिता वर्षाच्या अगदी जवळ आहे आणि दोघी बर्‍याचदा एकत्र दिसत असतात. विकीपूर्वी अंकिता सुशांत सिंह राजपूतसोबत रिलेशनशिपमध्ये होती. सुशांतच्या निधनानंतर अंकिता त्याच्या कुटुंबासोबत न्यायाची मागणी करताना दिसत आहे.

बातम्या आणखी आहेत...