आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आपबीती:ट्रोलिंगला कंटाळली अंकिता लोखंडे, म्हणाली - 'सुशांतसोबत ब्रेकअपनंतर मी डिप्रेशनमध्ये गेले होते, खूप वाईट काळ पाहिला आहे'

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या ब्रेकअपमुळे काही काळ डिप्रेशनमध्येही गेले होते, असा खुलासा अंकिताने केला.

बॉलिवूड अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने सोमवारी इंस्टाग्रामवर लाइव्ह येऊन आपला संताप व्यक्त केला. सुशांतच्या चाहत्यांनी सतत ट्रोल केल्याने ती कंटाळली आहे. जेव्हा जेव्हा अंकिता सोशल मीडियावर फोटो-व्हिडिओ शेअर करते तेव्हा सुशांतचे चाहते तिला ट्रोल करत असतात. यामुळे अंकिता खूप दुखावली गेली आहे. अंकिताने लाइव्ह येऊन सततचे ट्रोलिंग आणि ऑनलाईन होणारी शिवीगाळ या संदर्भात मन मोकळे केले आहे. सुशांतचा 14 जून 2020 रोजी संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला होता, त्याच्या मृत्यू प्रकरणाचा सीबीआय तपास करत आहे.

डिप्रेशनचा केला आहे सामना
अंकिताने आपल्या लाइव्ह व्हिडिओमध्ये सांगितले, 'मला दोन दिवसांपासून अस्वस्थ वाटत आहे. पण तसं वाटायचं खरंतर काही कारण नाही. म्हणून मी यातून बाहेर पडायचे ठरवले आणि आपली विचार प्रक्रिया बदलण्याचा प्रयत्न केला. मला माझा आनंद डान्समधून मिळतो. म्हणून मी माझ्या डान्सचे व्हिडिओज चाहत्यांसोबत शेअर करत असते. पण काही फॉलोवर्सकडून मला खूप वाईट कमेंट्स येतात.' तुम्हाला जर माझ्यामुळे इतका त्रास होत आहे, तरी तुम्ही मला का फॉलो करत आहात, असा सवाल तिने ट्रोलर्सला विचारला आहे.

सुशांत सिंह राजपूतसोबतच्या नात्याबद्दल ती म्हणाली की, 'कोणाचेही नाते आपण जज करू शकत नाही. आणि जर तुम्ही ते करत असाल तर तेव्हा तुम्ही कुठे होतात जेव्हा आमचे नातं संपुष्टात आले? त्याची स्वप्न मोठी होती आणि ती पूर्ण करण्यासाठी तो त्याच्या वाटेने निघून गेला, यात माझी काय चूक? त्यावरून तुम्ही मला का शिवीगाळ करत आहात? तुम्हाला माझ्याबद्दल काहीही माहित नाही आणि मी ते सांगू इच्छित नाही. त्यामुळे आमच्या ब्रेकअपसाठी मला जबाबदार धरणं बंद करा. या ब्रेकअपमुळे काही काळ डिप्रेशनमध्येही गेले होते,' असा खुलासा अंकिताने केला.

अंकिता आणि सुशांत 6 वर्षे लिव्ह इनमध्ये होते

अंकिता आणि सुशांत 'पवित्र रिश्ता' या मालिकेच्या सेटवर जवळ आले होते. दोघेही जवळजवळ 6 वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. पण 2016 मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले. ब्रेकअपनंतर सुशांत रिया चक्रवर्तीसोबत रिलेशनशिपमध्ये होता, तर अंकिताने मुंबईतील बिझनेसमन विकी जैनला डेट करण्यास सुरवात केली. लॉकडाऊनमध्ये अंकिता आणि विकी साखरपुडा करणार असल्याचीही बातमी समोर आली होती. असे म्हटले जाते की यावर्षी दोघे लग्न करु शकतात.

बातम्या आणखी आहेत...