आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

36 वर्षांची झाली अंकिता लोखंडे:सुशांतसोबतच्या ब्रेकअपनंतर अंकिताच्या आयुष्यात झाली विकी जैनची एंट्री, या सेलिब्रिटींनाही मिळाली प्रेमाची दुसरी संधी

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अंकिताला विकी जैन रुपात पुन्हा एकदा प्रेम गवसले.

अभिनेत्री अंकिता लोखंडे हिचा आज (19 डिसेंबर) वाढदिवस असून तिने वयाची 36 वर्षे पूर्ण केली आहेत. अंकितासाठी 2020 हे वर्ष चढउताराचे राहिले. तिचा पुर्वाश्रमीची प्रियकर आणि अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा 14 जून रोजी रहस्यमय परिस्थितीत मृत्यू झाला.

यामुळे अंकिताला मोठा धक्का बसला, कारण एकेकाळी ती आणि सुशांत एकमेकांच्या अगदी जवळ होते. जवळजवळ सहा वर्षे दोघे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिले होते. त्यानंतर 2016 मध्ये त्यांनी ब्रेकअप केला होता.

त्यानंतर सुशांतला रिया चक्रवर्तीच्या रुपात तर अंकिताला विकी जैन रुपात पुन्हा एकदा प्रेम गवसले. विकी हा एक बिझनेसमन आहे. अंकितासोबतचे त्याचे बाँडिंग अतिशय खास आहे आणि हे दोघेही पुढील वर्षी लग्न करणार असल्याची चर्चा आहे. अंकितापूर्वीही बॉलिवूडचे असे काही सेलिब्रिटी आहे, ज्यांचे पहिले नाते तुटल्यानंतर त्यांना दुस-यांदा प्रेमाची संधी मिळाली. एक नजर टाकुयात, अशाच काही सेलिब्रिटींवर ज्यांचे पहिले प्रेम अधुरे राहिले... मात्र हे दुःख विसरुन त्यांनी पुढे वाटचाल केली...

सना खान

'जय हो' फेम अभिनेत्री आणि 'बिग बॉस'ची रनर अप सना खान सध्या चर्चेत आहे, ऑक्टोबरमध्ये तिने एंटरटेन्मेंट इंडस्ट्रीला रामराम ठोकला. अल्लाहच्या वाटेवर जायचे आहे, म्हणून चित्रपट सृष्टीपासून संन्यास घेत असल्याची घोषणा करुन तिने सगळ्यांना हैराण केले होते. यानंतर काही दिवसांतच सनाने सूरतच्या मुफ्ती अनस सय्यदसोबत लग्न करून सर्वांना आणखी एख धक्का दिला.

सना काही महिन्यांपूर्वी नृत्यदिग्दर्शक मेल्विन लुईससोबतच्या ब्रेकअपमुळे नैराश्यात गेली होती. सनाने मेल्विनवर फसवणूक केल्याचा आरोप केला होता. मेल्विननंतर सनाला अनसच्या रुपात खरे प्रेम गवसले असून ती त्याच्यासोबत आनंदात आहे.

नेहा कक्कर

यावर्षी ऑक्टोबरमध्ये गायिका नेहा कक्करने रोहनप्रीत सिंगसोबत लग्न करुन त्याला आपला आयुष्याचा जोडीदार बनवले. रोहनपूर्वी नेहा अभिनेता हिमांश कोहलीसोबत रिलेशनशिपमध्ये होती. जून 2018 मध्ये नेहा आणि हिमांश यांच्यात वाद झाला होता, त्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाले. दिल्लीस्थित हिमांशने 'यारियां' (2014) चित्रपटातून डेब्यू केला होता. त्यात नेहाने 'सनी-सनी' हे गाणे गायले होते. या चित्रपटाच्या सेटवर दोघांची मैत्री झाली होती आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले होते.

जॉन अब्राहम

अभिनेता जॉन अब्राहम आणि बिपाशा बसू 8 वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. मात्र त्यांचे नाते लग्नापर्यंत पोहोचू शकले नाही. बिपाशासोबत ब्रेकअपनंतर जॉनने 2014 मध्ये बँकर प्रिया रुंचालशी लग्न केले. या दोघांच्या लग्नाला 6 वर्षे झाली असून दोघे सुखी वैवाहिक आयुष्य जगत आहेत.

प्रीती झिंटा

प्रीतीने तिच्यापेक्षा वयाने 10 वर्षांनी लहान असलेल्या जीन गुडनिफ या अमेरिकन नागरिकाशी केले आहे. 29 फेब्रुवारी 2016 रोजी या जोडीने लॉस एंजिलिसमधील एका खासगी कार्यक्रमात सप्तपदी घेतल्या. त्यानंतर जवळपास 6 महिन्यांनंतर प्रीती आणि जीनच्या लग्नाचे फोटो समोर आले होते.

याआधी प्रीती बिझनेसमन नेस वाडियाबरोबर रिलेशनशिपमध्ये होती, पण त्यांच्यात अनेकदा वाद झाले, जे समोर आले होते. त्यानंतर दोघांचे ब्रेकअप झाले होते.

बातम्या आणखी आहेत...