आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांतच्या चाहत्यांचा रोष:अंकिता लोखंडेच्या वाढदिवसाच्या पार्टीत संदीप सिंहची हजेरी, सुशांतच्या चाहत्यांनी केले अंकिताल ट्रोल

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संदीपला आमंत्रित का केले? असा सवाल सुशांतचे चाहते अंकिताला विचारत आहे.

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची पुर्वाश्रमीची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने 19 डिसेंबर रोजी आपला 36 वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने तिचा प्रियकर विकी जैनने एक पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला अंकिताच्या टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीतील अनेक मित्रांनी हजेरी लावली होती. विकास गुप्ता, रश्मी देसाई, अपर्णा दीक्षित यांच्यासह या पार्टीत निर्माता संदीप सिंहदेखील हजर होता. त्याच्या उपस्थितीमुळे सुशांतच्या चाहत्यांनी अंकिताला ट्रोल केले आहे.

अंकिताच्या बर्थडे पार्टीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. संदीप सिंह देखील या पार्टीत धमाल करताना दिसतोय. संदीपला पार्टीत का बोलावले, त्याला पार्टीत बोलावणे चुकीचे असल्याचे नेटक-यांनी अंकिताला म्हटले आहे.

नेटक-यांच्या प्रतिक्रिया

एका सोशल मीडिया यूजरने लिहिले, "सुशांतने तुला का सोडले? यात आता शंका नाही. तू अशा व्यक्तीसोबत आपला वाढदिवस साजरा केला, ज्याची एसएसआर प्रकरणात संशयास्पद भूमिका आहे."

आणखी एका नेटक-याने लिहिले, 'अंकिता तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तू आपल्या प्रियजनांसोबत वाढदिवस साजरा केला. तुझा खरा चेहरा दाखवल्याबद्दल धन्यवाद.'

संदीपला आमंत्रित का केले? असा सवाल सुशांतचे चाहते अंकिताला विचारत आहे.

सुशांतचे चाहते संदीपवर का आहेत नाराज ?
सुशांतच्या आत्महत्येनंतर संदीप सिंहची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली होती. 14 जून रोजी सुशांतने मुंबईतल्या राहत्या घरी आत्महत्या केली. त्यावेळी संदीप सिंह सुशांतसोबत फ्लॅटमध्ये होता, असे म्हटले जाते. याशिवाय सुशांतचे जिथे शवविच्छेदन झाले होते, त्या कूपर रुग्णालयातही तो दिसला होता. अंत्य विधीवेळी संदीप सुशांतच्या कुटुंबीयांसोबत दिसला होता. मात्र संदीपा ओळखत नसल्याचे सुशांतच्या कुटुंबीयांनी म्हटले होते. तर या संपूर्ण प्रकरणात संदीपची भूमिका संशयास्पद असल्याचे सुशांतचे वडील केके सिंह यांचे वकील विकास सिंह यांनी म्हटले होते. संदीप मात्र स्वतःला सुशांतचा जवळचा मित्र असल्याचे सांगतो.

बातम्या आणखी आहेत...