आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वेदना:सुशांतच्या आत्महत्येबद्दल समजताच अंकिता लोखंडेला बसला जबर धक्का, त्याच्या आत्महत्येच्या काही तासांपूर्वीच सोशल मीडियावर पोस्ट केले होते... 

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुशांत आणि अंकिता 6 वर्षे लिव्ह इनमध्ये होते.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने वांद्रे येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी सुशांत स्वतःचे आयुष्य संपवले. त्याच्या निधनाने चाहत्यांसोबतच कलाकरांनीही मोठा धक्का बसला आहे. सुशांतची पुर्वाश्रमीची गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेला याबाबत माहिती मिळाली तेव्हा तिला देखील धक्का बसला.

‘इंडिया टूडे’ने सुशांत सिंह राजपूतच्या निधनावर एक्स गर्लफ्रेंड अंकिताची प्रतिक्रिया घेण्यासाठी तिच्याशी संपर्क साधला होता. त्यावेळी तिला सुशांतने आत्महत्या केल्याचे माहितच नव्हते. तिने ‘काय?’ एवढा एकच शब्द बोलून फोन कट केला. अचानक सुशांतच्या निधनाची बातमी ऐकून अंकिताला मोठा धक्काला बसला.

सोशल मीडियावर केले होते पोस्ट...   

सुशांतच्या आत्महत्येच्या काही तासांपूर्वी अंकिता लोखंडेने सोशल मीडियावर पोस्ट केले होेते की, “देव अशा लोकांना जीवनातून हटवतो... कारण त्याने जे ऐकले आहे ते तुम्ही ऐकलेले नसते.’

अंकिता लोखंडेची सोशल मीडिया पोस्ट
अंकिता लोखंडेची सोशल मीडिया पोस्ट

या आत्महत्येमागे सुशांतचे अंकिताशी तुटलेले नाते असावे, असा संशय आहे. त्याची सुसाइड नोट सापडलेली नाही. त्यामुळे फोन व लॅपटॉपमधून पुरावे मिळतात का, हे पोलिस तपासत आहेत.

अभिनेत्री अंकिताशी असलेल्या संबंधांत तणाव

‘पवित्र रिश्ता’मध्ये सुशांतची अभिनेत्री अंकिता लोखंडेशी ब्रेकअप झाल्याचे मानले जात होते. ब्रेकअपनंतर अंकिताचा एका उद्योजकाशी साखरपुडा झाल्याच्या बातम्या होत्या.

6 वर्षे लिव्ह इनमध्ये होते दोघे 

पवित्र रिश्ता या मालिकेच्या सेटवर सुशांत आणि अंकिता जवळ आले होते. जवळजवळ 6 वर्षे हे दोघे लिव्ह इनमध्ये राहिले होते. पवित्र रिश्तानंतर झलक दिखला जा या रिअॅलिटी शोमध्येही दोघे सहभागी झाले होते. याच मंचावर सुशांतने अंकिताला प्रपोज केले होते. 

जानेवारी 2016 मध्ये हे दोघे लवकरच लग्न करणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. पण काही दिवसांतच दोघांनी ब्रेकअप केल्याचे जाहिर केले होते. दोघांचे ब्रेकअप झाले तेव्हा अनेक तर्कवितर्क लावण्यात आले होते. त्यावेळी सुशांत  ब्रेकअपविषयी म्हणाला होता की, लोक फक्त एकमेकांपासून दूर होतात.. आणि हे खूप दुर्दैवी असते.  

बातम्या आणखी आहेत...