आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ट्रोलिंगचा परिणाम:अंकिता लोखंडेच्या बॉयफ्रेंडने ट्रोलिंगला कंटाळून उचलले मोठे पाऊल, सोशल मीडियावरील कमेंट सेक्शन केला बंद 

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अंकिता अनेकदा विकीबरोबरचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनाने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सुशांतने आत्महत्या का केली याचा तपास पोलिस करत आहेत. पण सोशल मीडियावर त्याच्या आत्महत्येसंदर्भात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. बॉलिवूडमधील घराणेशाहीला कंटाळून त्याने आत्महत्या केली अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. यामुळे दिग्दर्शक-निर्माता करण जोहर, आलिया भट्ट, अनन्या पांडे यांसारख्या सेलेब्रिटींना लोकांच्या द्वेषाचा सामना करावा लागत आहे. आता नेटक-यांनी अभिनेत्री अंकिता लोखंडेचा बॉयफ्रेंड विकी जैन यालादेखील ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

  • सोशल मीडियावरुन विकीवर साधला जातोय निशाणा  

सुशांतच्या मृत्यूनंतर विकीला सोशल मीडियावर सतत तिरस्कारयुक्त कमेंट्स येत होत्या. त्यानंतर विकीने एक मोठा निर्णय घेतला. त्याने त्याचा कमेंट बॉक्स सर्वांसाठी बंद करुन लिमिटेड कमेंटचा पर्याय निवडला आहे. जेणेकरून त्यांच्या पोस्टवर कोणीही भाष्य करू शकणार नाही. त्यामुळे यापुढे आता  केवळ त्याला फॉलो करत असलेल्या व्यक्ती त्याच्या पोस्टवर कमेंट करु शकतात. विकी सोशल मीडियावर फारसा अ‍ॅक्टिव नाही. त्याने गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये शेवटची पोस्ट केली होती, परंतु सुशांतच्या निधनानंतर नेटकरी त्याच्या जुन्या पोस्टवरच कमेंट करु लागले होते. 

एका नेटक-याने विकीला अंकितासोबत ब्रेकअप करण्याचा सल्ला दिला आहे. एका यूजरने  लिहिले, "तू अंकिता आणि सुशांत यांच्या मध्ये आला असावा', असे म्हणत त्याच्यावर निशाणा साधला. काहींनी मात्र सुशांतच्या निधनानंतर अंकिताची काळजी घेण्याचा सल्लादेखील विकीला दिला आहे.

  • सुशांतपासून विभक्त झाल्यानंतर विकी आला आयुष्यात

सुशांत आणि अंकिता 6 वर्षे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते, पण 2016 मध्ये दोघांचे ब्रेकअप झाले. काही दिवसांनी उद्योगपती असलेला विकी जैन अंकिताच्या आयुष्यात आला. अंकिता अनेकदा विकीबरोबरचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. या वर्षाच्या अखेरीस दोघे लग्न करणार असल्याचे वृत्त आहे.  

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser