आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाचा शूटिंगवर परिणाम:70 वर्षीय रजनीकांत यांची कोविड टेस्ट निगेटिव्ह; 'अन्नाथे'च्या शूटिंग सेटवर 8 क्रू मेंबर्सना कोरोनाची लागण, शूटिंग थांबवले

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रजनीकांत यांच्या चित्रपटाच्या सेटवर 8 लोक कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्या आगामी अन्नाथे या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली होती. मात्र आता याच चित्रपटाच्या सेटवरुन एक मोठी बातमी समोर आली आहे. रजनीकांत यांच्या चित्रपटाच्या सेटवर 8 लोक कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर 70 वर्षीय रजनीकांत यांच्या कोरोना टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. रिपोर्ट्सनुसार, ते बुधवारी रात्री किंवा गुरुवारी चेन्नईला परततील.

8 दिवसांपूर्वीच सुरु झाले होते चित्रीकरण

सेटवर क्रू मेंबर्स पॉझिटिव्ह आल्यानंतर आता चित्रपटाचे शूटिंग बंद करण्यात आले आहे. हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटीमध्ये 14 डिसेंबरपासून या चित्रपटाचे शूटिंग सुरु झाले होते. या विषयावर बोलताना रजनीकांतचे प्रवक्ते रियाज अहमद यांनी इंडिया टुडेसोबत या वृत्ताला दुजोरा दिला आहे. प्रवक्त्याने इंडिया टुडेला दिलेल्या माहितीत सांगितले की, चित्रपटाच्या सेटवर उपस्थित लोकांपैकी 8 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. याच कारणास्तव, रजनी सर हैदराबादमध्ये स्वत: ला क्वारंटाइन करतील किंवा चेन्नईला परत येईल. या चित्रपटाचे 45 दिवसांचे शूट शेड्युल होते.

शूट सुरू होण्यापूर्वी सन पिक्चर्स, प्रॉडक्शन हाऊसने चार्टर्ड विमानाची व्यवस्था केली होती. रजनीकांत यांच्यासह त्यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांतही त्यांच्यासोबत हैदराबादला आली होता. प्रोडक्शन हाऊसने ऐश्वर्या आणि वडील रजनीकांत यांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होता.

पुढील वर्षी येणार रजनीकांत यांचा चित्रपट आणि राजकीय पक्ष
'अन्नाथे' या चित्रपटात रजनीकांत यांच्यासह किर्ती सुरेश, मीना, खुशबू, प्रकाश राज आणि सूरी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटात जॅकी श्रॉफ हे देखील एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील. शिवा या चित्रपटाचे दिग्दर्शक असून हा चित्रपट पुढील वर्षी म्हणजे एप्रिल 2012 मध्ये रिलीज करण्याचे निश्चित करण्यात आले होते. याशिवाय 2021 मध्ये तामिळनाडूमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत रजनीकांत आणि त्यांचा पक्ष काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. रजनीकांत यांनी महत्त्वाच्या बैठकीसंदर्भात आपले निवेदन जारी केले होते. यात म्हटले होते की, ‘ते आधी रजनी मक्कल मंद्रमच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील, त्यानंतर ते विधानसभा निवडणूक लढविणार की नाही याचा निर्णय घेतील.’ रजनीकांत यांच्या चित्रपटाविषयी बोलायचे झाले म्हणजे, ते 'दरबार' या चित्रपटात शेवटचे दिसले होते.

बातम्या आणखी आहेत...