आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अनाउंसमेंट्स ऑफ द डे:प्रभासच्या 'सालार'मध्ये झाली श्रुती हासनची एंट्री, 'ट्यूसडेज एंड फ्राईडेज'मधून पूनम ढिल्लनचा मुलगा अनमोल करणार पदार्पण

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आज आगामी चित्रपटांच्या घोषणा झाल्या आहेत.

गुरुवारी बी-टाऊनमध्ये काही प्रमुख घोषणा झाल्या. श्रुती हासनची तिच्या वाढदिवशी अभिनेता प्रभासबरोबर काम करण्याची इच्छा पूर्ण झाली. आणखी एक स्टार किड अनमोल ढिल्लनच्या डेब्यू फिल्मची रिलीज डेट समोर आली आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनने आपला आगामी 'पुष्पा' हा चित्रपट इंडिपेंडन्स वीकेण्डला रिलीज करण्याची घोषणा केली.

  • आणखी एक स्टार किड बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. संजय लीला भन्साळी आणि भूषण कुमार यांच्या आगामी ट्यूसडेज एंड फ्राईडेज या चित्रपटाद्वारे अभिनेत्री पूनम ढिल्लन यांचा मुलगा अनमोल ठाकरिया ढिल्लन बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटात अनमोलसोबत झतालेखाचीही भूमिका आहे. हा चित्रपट 19 फेब्रुवारी 2021 रोजी प्रदर्शित होत आहे. दिशा तरणवीर सिंग या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.
  • श्रुती हासनच्या 35 व्या वाढदिवशी सालार या आगामी चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक महत्त्वाची घोषणा केली. या चित्रपटातून श्रुती प्रथमच प्रभाससोबत झळकणार आहे. प्रभासने स्वत: सोशल मीडिया अकाउंटवर याची माहिती दिली. प्रभासने तिला शुभेच्छा देताना लिहिले, 'वाढदिवसाच्या शुभेच्छा श्रुती, सालारमध्ये तुझ्याबरोबर काम करण्याची वाट पहात आहे'. सालारचे दिग्दर्शन प्रशांत नील हे आहेत, तर निर्मिती विजय किरंगदूर यांची आहे.
  • यावर्षी स्वातंत्र्य दिनाच्या दोन दिवस आधी अल्लू अर्जुनचा आगामी पुष्पा हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तेलुगू, हिंदी, तामिळ आणि मल्याळममध्ये एकाच वेळी हा चित्रपट प्रदर्शित होईल. 13 ऑगस्टला येत असलेल्या या चित्रपटात अल्लूसह रश्मिका मंदाना दिसणार आहे. दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. चित्रपटाची निर्मिती मायथ्री मूव्ही मेकर्स आणि मुत्तमसेट्टी मीडिया यांनी केली आहे.
  • यावर्षी 30 जुलै रोजी वरुण तेजचा स्पोर्ट्स ड्रामा 'घानी' रिलीज होईल. या चित्रपटात वरुण एका बॉक्सरच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकताच या चित्रपटातील वरुणचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला होता. तारीख जाहीर करताना वरुणने सोशल मीडियावर लिहिले- या जुलैमध्ये रिंगमध्ये एन्ट्री होईल. घानीमध्ये सई मुखर्जी, उपेंद्र, सुनील शेट्टी आणि नवीन चंद्र यांचीही भूमिका असेल.
बातम्या आणखी आहेत...