आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपकमिंग:अक्षयने साइन केला आणखी एक विनोदीपट, जुलै 2021 मध्ये होणार पूर्ण;  मुदस्सर अजीज करणार दिग्दर्शन

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अक्षयचा आगामी चित्रपट हा मुदस्सर अजीजचा विनोदी चित्रपट आहे.

अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी’ चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला आहे. मात्र त्याला हवा तसा प्रतिसाद मिळाला नसल्याची चर्चा आहे. सोशल मीडियावर चित्रपटासंदर्भात संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. लक्ष्मीनंतर आता अक्षय आपल्या उर्वरित चित्रपटांमध्ये व्यग्र झाला आहे. दिवाळीच्या दिवशीही तो काम करणार आहे. या दरम्यान त्याने आणखी एका चित्रपटावर साइन केली असल्याचे ऐकले आहे.

अक्षयने साइन केलेला आगामी चित्रपट हा मुदस्सर अजीजचा विनोदी चित्रपट आहे, त्यावर पुढच्या वर्षी जुलै महिन्यात काम सुरू होणार आहे. पटकथा ऐकताच अक्षय तयार झाल्याची चर्चा आहे. अक्षयने काही दिवसांपूर्वी आपल्या ‘बेल बॉटम’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. त्यांचा ‘सूर्यवंशी’ हा चित्रपटही तयार असून त्याची रिलीजची तारीख कधीही जाहीर होऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...