आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Another Good News For The Theatre Fraternity, After 'Bell Bottom', Amitabh Bachchan Starrer 'Chehre' Is Also Releasing In Theatres; Anand Pandit's Official Announcement

इंटरव्ह्यू:चित्रपटसृष्टीसाठी आणखी एक आनंदाची बातमी, 'बेलबॉटम' नंतर 'चेहरे'देखील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होतोय; आनंद पंडित यांची अधिकृत घोषणा

अमित कर्ण4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सहा आठवड्यांनंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार चित्रपट

कोरोना महामारीमुळे गेली दीड वर्षे बंद पडलेल्या चित्रपटगृहांसाठी आता अच्छे दिन परतत आहेत. पुढच्या आठवड्यात अक्षय कुमारचा 'बेलबॉटम' हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होतोय. तर दुसरीकडे 27 ऑगस्ट रोजी अमिताभ बच्चन स्टारर 'चेहरे' हा चित्रपटसुद्धा चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. चित्रपटाचे निर्माते आनंद पंडित यांनी स्वतः याची घोषणा केली आहे. चित्रपट थिएटर रिलीजच्या सहा आठवड्यांनंतर ओटीटीवर येईल.

'चेहरे' 27 ऑगस्टला सिनेमागृहात रिलीज होणार आहे
दैनिक भास्करसोबत खास बातचीत करताना आनंद पंडित म्हणाले, "आम्ही आमचे वचन पूर्ण केले. 'चेहरे' आधी चित्रपटगृहांमध्ये रिलीज होत आहे. आम्ही 27 ऑगस्टला येत आहोत. ज्याप्रकारे अक्षय चित्रपटगृहांमध्ये 'बेलबॉटम' घेऊन येतोय, त्याचप्रमाणे अमिताभ बच्चन साहेबांचेही म्हणणे आहे की, आपण 'चेहरे' चित्रपटगृहांमध्ये आणला पाहिजे. जर आणखी दोन किंवा तीन मोठे चित्रपटांची थिएटर रिलीज डेट जाहीर झाली तर चित्रपट चित्रपटगृहांमध्ये येण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू होईल," असे पंडीत म्हणाले.

सहा आठवड्यांनंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार चित्रपट
आनंद पंडित पुढे म्हणाले, "'चेहरे' हा चित्रपट आम्हाला शिक्षक दिन किंवा गांधी जयंतीसारख्या महत्त्वाच्या तारखेला आणता आला असता. पण, आम्ही ठरवले की अक्षयचा चित्रपट 19 ऑगस्टला येत
आहे, त्यानंतर पुढच्या आठवड्यात नवीन कंटेंट येण्याचे सातत्य राखायला हवे. चित्रपटसृष्टीची उपजीविका पुन्हा सुरू होईल. चित्रपट प्रथम चित्रपटगृहात पोहोचेल. तो सहा आठवड्यांच्या अंतरानंतर
ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होईल. कोविड पुर्वी हे अंतर आठ आठवड्यांचे असायचे. विजयचा 'मास्टर' निश्चितच अपवाद होता. तो चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर दोन आठवड्यांनी ओटीटीवर आला. कदाचित तो करार आधीच झाला असावा."

आनंद पंडित म्हणतात, "सिनेमा हॉल सेक्टरचे सर्वात मोठे सर्किट मुंबई आणि महाराष्ट्रातील थिएटर अद्याप उघडणार की नाही, हा प्रश्न आहेच. जर 'बेलबॉटम' किंवा 'चेहरे' सारखे तीन -चार चित्रपट घोषित केले गेले तर महाराष्ट्र प्रशासनावरही दबाव निर्माण होईल. जर तेथील रेस्तराँ, बार, विमानतळ, लोकल ट्रेन सुरु झाल्या आहेत, तर मग सिनेमागृह का नाही. जेव्हा 200 लोकांना लग्नांमध्ये सहभागी होण्याची परवानगी आहे, तर सिनेमागृहांसोबतच हे शत्रुत्व का? जर 27 ऑगस्टपर्यंत थिएटर सुरु झाले नाहीत, तर चित्रपट इतर राज्यांतील सिनेमागृहांमध्ये रिलीज होईल," असे ते म्हणाले.

अमिताभ बच्चन यांच्या एका कवितेचाही चित्रपटात समावेश करण्यात आला आहे
आनंद पंडित म्हणाले, "'चेहरे'चे सेन्सॉर प्रमाणपत्रही आले आहे. अमिताभ बच्चन यांची कविता देखील चित्रपटात समाविष्ट करण्यात आली आहे. बच्चन साहेबांना एक कविता खूप आवडली. त्यामुळे
त्यांनी चित्रपटात फक्त त्याचा ऑडिओ बनवला. नंतर त्याचा व्हिडीओ देखील चित्रीत करण्यात आला. तो फिल्मसिटीमध्येच चित्रीत झाला. ती कविता तीन दिवसांत चित्रित केली गेली. स्लोव्हाकियामधील कंटीन्यूटीसाठी तोच पोशाख परिधान करून, बच्चन साहेबांनी उणे 17 अंश सेल्सिअसमध्ये चित्रीकरण केले. तसे थंडीचे वातावरण दिल्ली आणि मुंबईच्या स्टुडिओत तयार केले गेले."

बातम्या आणखी आहेत...