आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रहमानचा अनोखा सन्मान:कॅनडातील आणखी एका रस्त्याला एआर रहमानचे नाव, ट्वीट करून व्यक्त केली कृतज्ञता

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एआर रहमान हे केवळ देशातच नाही तर जगभरात त्यांच्या संगीतासाठी प्रसिद्ध आहेत. अलीकडेच रहमानला कॅनडातून असा सन्मान मिळाला आहे, जो याआधी क्वचितच कुणाला मिळाला असेल. भारताचे प्रसिद्ध संगीतकार एआर रहमान यांना कॅनडातील मार्कहम शहराने मोठा सन्मान दिला आहे, ही भारतासाठीही अभिमानाची बाब आहे. मार्कहम शहराने एका रस्त्याचे नाव 'एआर रहमान' असे ठेवले आहे. यापूर्वी 2013च्या सुरुवातीला याच शहरातील एका रस्त्याला संगीतकार ए.आर. रहमान - अल्लाह-रखा रहमान असे नाव देण्यात आले होते.

आता यावर संगीतकार रहमान यांनी त्यांचे आभार मानत ट्विट केले आहे. मिळालेल्या या सन्मानामुळे एआर रहमान खूप खुश आहेत. एवढेच नाही तर संपूर्ण देशाला त्यांचा अभिमान आहे. त्यांनी ट्विट केले की, "मी मार्कहम शहर, महापौर फ्रँक स्कारपिटी आणि कॅनडातील लोकांचा आभारी आहे."

ट्विट करून मानले आभार

रहमान यांनी ट्विटरच्या माध्यमातून कॅनडाचे महापौर आणि कॅनडावासीयांचे आभार मानले आहेत. त्यांनी ट्विट करून लिहिले की, मी माझ्या आयुष्यातही असा विचार केला नव्हता. मी येथील महापौर आणि समुपदेशक तसेच भारतीय वाणिज्य दूतावास जनरल अपूर्व श्रीवास्तव आणि कॅनडातील लोकांचा खूप आभारी आहे."

एआर रहमानने सांगितले आपल्या नावाचे महत्त्व

संगीतकार एआर रहमान यांनी आपल्या आभार पत्रात आपल्या नावाचं महत्त्व सांगितलं आहे. त्यांनी लिहिलं की, "एआर रहमान हे नाव एकटे नाही. याचा अर्थ खूप खोल आहे. याचा अर्थ दयाळू. दयाळू असणे हा एक गुण आहे जो आपल्याला देवाकडून मिळतो. या गुणाचे आपण सर्व पालनकर्ते आहोत. म्हणून हे नाव कॅनडातील लोकांना शांती, आनंद आणि निरोगी जीवन जगण्याची संधी देवो. देवाचे आशीर्वाद तुम्हा सर्वांवर असोत."

बातम्या आणखी आहेत...