आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'अंतिम: द फाइनल ट्रुथ'चे पहिले गाणे रिलीज:सलमान खान, आयुष शर्मा आणि वरुण धवन या गणपतीत दर्शकांना थिरकवणार 'विघ्नहर्ता'च्या तालावर!

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सलमानने ट्विटरवर गाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.

सलमान खान आणि आयुष शर्मा स्टारर अॅक्शन ड्रामा 'अंतिम: द फाइनल ट्रुथ' या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट बघत आहेत. आता चाहत्यांची प्रतिक्षा ही संपणार आहे. कारण निर्मात्यांनी या चित्रपटातील पहिले गाणे गणेशोत्सवाच्या निमित्ताने आज रिलीज केले आहे. बुधवारी या गाण्याचा टीझर सलमानने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केला होता. 'बाप्पा येत आहेत...', असे कॅप्शन सलमानने दिले होते. आता या गाण्याचा संपूर्ण ट्रॅक रिलीज झाला आहे आणि याला मिळणारा दर्शक आणि चाहत्यांचा प्रतिसाद जबरदस्त आहे. सलमानने ट्विटरवर गाण्याचा व्हिडिओ शेअर करत 'अंतिमची सुरुवात बाप्पाच्या आशीर्वादाने,' असे कॅप्शन दिले आहे.

'अंतिम: द फाइनल ट्रुथ'ची हाय-ऑन एनर्जी फेस्टिव डान्स ट्रॅकमध्ये सलमान खान आणि आयुष शर्मासह वरुण धवनचा स्पेशल अपिअरन्स आहे. या ट्रॅकमध्ये वरुण आणि आयुष यांच्या ऊर्जावान डान्स स्टेप्स असून कानसेनांसाठी एक कर्णमधुर पर्वणी आहे.

'अंतिम: द फाइनल ट्रुथ'मध्ये सलमान खान आणि आयुष शर्मा पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. सलमान खान फिल्म्स द्वारा प्रस्तुत, ‘अंतिम’ सलमा खान द्वारा निर्मित आणि महेश मांजरेकर यांच्याद्वारे दिग्दर्शित आहे. या चित्रपटातून महिमा मकवाना बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ हा चित्रपट मराठी हिट चित्रपट ‘मुळशी पॅटर्न’चा हिंदी रिमेक आहे.

बातम्या आणखी आहेत...