आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंतिमः द फाइनल ट्रुथ:'विघ्नहर्ता' गाण्याचा टीझर आउट, गाण्यात दिसणार वरुण धवनचा धमाकेदार डान्स

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हा टीझर गणपती उत्सवाच्या भव्यतेला दर्शवतो.

सलमान खान आणि आयुष शर्मा स्टारर अॅक्शन ड्रामा 'अंतिम: द फाइनल ट्रुथ' या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट बघत आहेत. आता चाहत्यांची प्रतिक्षा ही संपणार आहे. कारण निर्मात्यांनी या चित्रपटातील पहिले गाणे गणेशोत्सवाच्या निमित्ताने रिलीज करण्याचे ठरवले आहे. उद्या म्हणजेच गुरुवारी या चित्रपटातील 'विघ्नहर्ता' हे पहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तत्पूर्वी आज सलमानने या गाण्याचा टीझर आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केला आहे. 'बाप्पा येत आहेत...', असे कॅप्शन सलमानने दिले आहे. हा टीझर गणपती उत्सवाच्या भव्यतेला दर्शवतो.

'विघ्नहर्ता' हे गाणे ऊर्जा आणि भव्यता असलेले एक परिपूर्ण फेस्टिवल साँग आहे. गणपती उत्सवाचे सार या टीजरमध्ये सामावले असून हा टीझर म्हणजे हा ट्रॅक कसा आहे याची परफेक्ट झलक आहे. गाण्याच्या या अनोख्या टीझरसोबत चित्रपटाबाबतचा उत्साह आधी पेक्षा अनेक पटीने वाढला आहे.

या टीझरमधून आपल्याला सलमान खान आणि आयुष शर्मा यांच्या आकर्षक आणि मोहक अदा पाहायला मिळत असून अपेक्षांना आणखी उच्च स्तरावर घेऊन जातो. या गाण्यात अभिनेता वरुण धवनचा स्पेशल अपिअरन्स असणार आहे.

'अंतिम: द फाइनल ट्रुथ'मध्ये सलमान खान आणि आयुष शर्मा पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. सलमान खान फिल्म्स द्वारा प्रस्तुत, ‘अंतिम’ सलमा खान द्वारा निर्मित आणि महेश मांजरेकर यांच्याद्वारे दिग्दर्शित आहे. या चित्रपटातून महिमा मकवाना बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ हा चित्रपट मराठी हिट चित्रपट ‘मुळशी पॅटर्न’चा हिंदी रिमेक आहे.

बातम्या आणखी आहेत...