आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूडमध्ये दरवर्षी अनेक चेहेर हिंदी फिल्म इंडस्ट्रीत आपले नशीब आजमावण्यासाठी मुंबईला येत असतात. यापैकी काही जणांच्या हाती यश येतं तर काहींना निराश होऊन येथून निघून जाव लागतं.
फिल्मी दुनियेत कोणी एका रात्रीतून स्टार होतो, तर कुणाचा कारकिर्दीचा आलेख कोणत्या ना कोणत्या कारणाने अचानक खाली येतो. आज आज आम्ही तुम्हाला अशाच काही सेलिब्रिटींबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी अल्पावधीतच चाहत्यांमध्ये स्वतःची जबरदस्त क्रेझ निर्माण केली पण काही काळानंतर या सेलेब्सचे स्टारडम एका अपघाताने संपुष्टात आले. या सेलिब्रिटींनी अपघातात स्वतःचा मृत्यू जवळून अनुभवला. कोण आहेत हे कलाकार आणि नेमके त्यांच्यासोबत काय घडले होते ते जाणून घेऊयात -
महिमा चौधरी
'परदेस' या चित्रपटाद्वारे आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या महिमाने अल्पावधीतच चाहत्यांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले होते, मात्र एका अपघाताने तिचे करिअर उद्ध्वस्त केले. ‘दिल क्या करे’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी ती सेटवर जात असताना अचानक एका ट्रक चालकाने तिच्या कारला जोरदार धडक दिली.
हा अपघात इतका भीषण होता की तिच्या चेहऱ्यात काचेचे तुकडे शिरले होते. यानंतर तिचा संपूर्ण चेहरा खराब झाला आणि या अपघातानंतर महिमाने स्वत:ला फिल्मी जगापासून दूर केले. अलीकडेच, अभिनेत्रीने स्तनाच्या कर्करोगाशी लढाई जिंकली आहे.
अनु अग्रवाल
'आशिकी' या पहिल्याच चित्रपटातून अनु अग्रवाल यांनी लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केले होते. यानंतर त्यांचे नाव आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीत सामील झाले. अनु यांनाही भरपूर ऑफर्स येऊ लागल्या, पण त्यांच्या नशिबात वेगळंच काही लिहिले होते.
1999 मध्ये एका पार्टीतून परतत असताना अनु यांच्या कारचा भीषण अपघात झाला. या अपघातामुळे त्या कोमात गेल्या होत्या, 29 दिवसांनी शुद्धीवर आल्यावर त्यांची स्मरणशक्तीही गेली होती. काही काळानंतर उपचारांमुळे त्यांची स्मरणशक्ती परत आली, पण तोपर्यंत त्यांची अभिनय कारकीर्द पूर्णपणे संपली होती.
साधना
एक काळ असा होता की, निर्मात्यांची पहिली पसंती साधना यांनाच असायची. त्यांच्या सौंदर्याचे सर्वजण कौतुक करायचे. विशेषतः त्यांची हेअरस्टाईल इतकी प्रसिद्ध झाली की लोकांनी त्याला 'साधना हेअरकट' असे नाव दिले होते.
साधनाचे यांचे संपूर्ण आयुष्य मात्र एका अपघाताने बदलून गेले. या अपघातात त्यांच्या डोळ्यांना गंभीर दुखापत झाली, त्यामुळे साधना यांचा संपूर्ण चेहराच बदलून गेला. त्यानंतर बराच काळ त्या कुठेच दिसल्या नाही आणि 2015 मध्ये त्यांचे निधन झाले.
झीनत अमान
असाच काहीसा प्रकार गतकाळातील प्रसिद्ध अभिनेत्री झीनत यांच्यासोबत घडला होता. झीनत आणि संजय खान दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. काही काळानंतर त्यांच्या नात्यात कटुता आली. एके दिवशी संजय यांनी रागात झीनत यांना मारहाण केली, त्यामुळे त्यांच्या डोळ्याला दुखापत झाली आणि त्यांचा एक डोळा खराब झाला. त्याचा परिणाम त्यांच्या अभिनय कारकिर्दीवर झाला आणि झीनत यांना चित्रपट मिळणे बंद झाले.
चंद्रचूड सिंग
चंद्रचूड हा एकेकाळचा बॉलिवूडचा सर्वात बिझी अभिनेता मानला जायचा. 'जोश' या चित्रपटात त्याने दमदार अभिनय केला होता. 2000 मध्ये त्याचा एक भीषण अपघात झाला, ज्यामुळे त्यांच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली. या दुखापतीवर बराच काळ उपचार सुरू होते, त्यामुळे चंद्रचूडचे वजन बरेच वाढले आणि त्याला काम मिळणे बंद झाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.