आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑलिम्पिकमध्ये झाली पोलखोल:इस्रायलचे राष्ट्रगीत ऐकल्यानंतर प्रेक्षकांना आठवले अनु मलिकचे ‘मेरा मुल्क मेरा देश’ हे गाणे, म्हणाले - एखाद्या देशाचे राष्ट्रगीत पण चोरायचे सोडले नाहीस

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नेटकऱ्यांनी अनु मलिक यांना ट्रोल करायला सुरुवात केली.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये इस्त्रायलचे जिमनॅस्ट अर्टम डोल्गोपयात यांना सुवर्ण पदक मिळाल्यानंतर अनु मलिक यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे. झाले असे की, ऑलिम्पिकमध्ये जो खेळाडू सुवर्ण पदक जिंकतो त्याच्या देशाचे राष्ट्रगीत लावले जाते आणि अर्टम डोल्गोपयात यांना सुवर्ण पदक मिळाल्यानंतर इस्रायलचे राष्ट्रगीत लावण्यात आले आणि नंतर अनु मलिक ट्रोल झाले आहेत. इस्त्रायलचे हातिकवाह हे राष्ट्रगीत ऐकल्यानंतर प्रेक्षकांना ‘मेरा मुल्क मेरा देश’ हे गाणे आठवले. 'दिलजले' या चित्रपटातील हे गीत अनु मलिक यांनी संगीतबद्ध केले होते.

25 वर्षांपूर्वी बनवले होते हे गाणे
अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला दिलजले हा चित्रपट 1996 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील ‘मेरा मुल्क मेरा देश मेरा ये चमन’ हे गाणे अनु मलिक यांनी संगीतबद्ध केले होते. या गाण्याचे संगीत आणि इस्त्रायलच्या राष्ट्रगीताशी साम्य साधणारे आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी अनु मलिक यांना ट्रोल करायला सुरुवात केली.

चोरी करण्यासाठी एखाद्या देशाचे राष्ट्रगीतही सोडले नाही, अशा शब्दांत नेटक-यांनी अनु मलिकला सुनावले आहे. एक नेटकरी म्हणाला, ‘इस्रायलचे राष्ट्रगीत आणि ‘दिलजले’ या चित्रपटातील ‘मेरा मुल्क मेरा देश मेरा ये चमन’ गाण्यात थोडे साम्य आहे. अनु मलिकने या गाण्याला संगीत बद्ध केल्याने, मला आता 100 टक्के खात्री आहे की त्याने हे संगीत कॉपी केले असणार.’ तर आणखी एका नेटक-याने अनु मलिक यांना ट्रोल करताना म्हटले, ‘अनु मलिकने इस्रायलचे राष्ट्रगीत कॉपी केले कोण म्हणाले? मला तर वाटते की ऑलिम्पिकमध्ये अनु मलिकचे ‘मेरा मुल्क मेरा देश गाणं’ हे अनु मलिकच्या सन्मासाठी लावले होते.’ आणखी एक नेटकरी म्हणाला, ‘संगीत चोरण्यासाठी ऑलिम्पिकमध्ये कोणता खेळ असता तर अनु मलिकला नक्कीच सुवर्ण पदक मिळाले असते.’

यापूर्वीही अनु मलिक यांनी कॉपी केली गाणी
अनु मलिक यांनी पहिल्यांदाच एखादे गाणे कॉपी केले असे नाही. यापूर्वीही त्यांच्यावर संगीत चोरीचा आरोप लागला आहे. त्यांनी कॉपी केलेली 5 प्रसिद्ध गाणी...

  • गाणे - 'राजा को रानी से प्यार हो गया' चित्रपट - 'अकेले हम अकेले तुम' 1995 ओरिजिनल - लव्ह थीम बाय गॉडफादर निनो रोटा
  • गाणे - 'मेरा पिया घर आया ओ राम जी' चित्रपट - 'याराना' 1995 ओरिजिनल - पाकिस्तानी गाणे गायक नुसरत फतेह अली खान
  • गाणे - 'ये काली काली आँखें' चित्रपट - 'बाजीगर' 1993 ओरिजिनल - येके येके, फ्रेंच गाणे गायक - मोरी कानटे
  • गाणे - 'तारे है बाराती चांदनी है ये बारात' चित्रपट - 'विरासत' 1997 ओरिजिनल - एल कंडर पासा, गायक - सायमन आणि गरफंकले (1970)
  • गाणे - 'हारे हारे हारे ... हम तो दिल से हरे' चित्रपट - 'जोश' 2000 ओरिजिनल - कन्क्वेस्ट ऑफ पॅराडाईज, (1994) ग्रीक गायक वंगेलिस

या व्यतिरिक्त, आणखी एक मनोरंजक गोष्ट म्हणजे इस्त्रायलचे राष्ट्रगीत हातिकवाहचे संगीतदेखील ओरिजिनल नाही. याचे संगीत 16 व्या शतकातील ला मंटोवना या इटालियन गाण्याने प्रेरित आहे. ला मंटोवना हे पोलंड, स्पेन आणि युक्रेनमध्ये वेगवेगळ्या प्रकारे वापरले गेले आहे.

बातम्या आणखी आहेत...